Saturday, September 19, 2015

आत्मविश्वास ..... स्वत: चा स्व: शी संवाद ............. डॉ. विद्याधर बापट .......

  • आत्मविश्वास ..... 

स्वत: चा स्वत : शी संवाद ............. 
डॉ. विद्याधर बापट ....... 




  • स्वत:त सुधारणा घडवून आणण्याची तीव्र इच्छाशक्ती हवी. आत्मविश्वास मिळवणं आणि वाढवणं हे प्रत्येकाला शक्य आहे हे लक्षात घेऊया.
  •  स्वत:मध्ये रुजलेली भिती व असुरक्षितता ह्यांना ओळखा, जाणून घ्या. त्यावरचे उपाय शोधा. आवश्यक तर तज्ञांची मदत घ्या.



  • स्वत:ची शरम वाटून घेऊ नका किंवा किंव करू नका.
  • एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कुठलाही माणूस परिपूर्ण नाही. कुणाच्याही हातून चुका होऊ शकतात. तशीच आपल्याही हातून चूक होऊ शकते. त्यामुळे निराश होऊ नका. स्वत:ला क्षमा करा.चूकांमधून शिका आणि पुनरावृत्ती टाळा.
  • इतरां पेक्षा आपण कमी आहोत ही भावना मनातून काढून टाका.
  • आपला स्वत:शी संवाद (self talk)  सतत चालू असतो. तो सकारात्मक होतो आहे ह्याकडे लक्ष्य द्या.
  • इतरांकडून दयेची, सहानभूतीची अपेक्षा करू नका. त्यानं तुमची आत्मप्रतिमा दुबळी होईल व आत्मविश्वास कमी होईल.

  1. तुमच्या बलस्थानांचा सतत विचार करा, ती शोधून काढा, त्यावर लक्ष केंद्रित करा.
  • मिळालेल्या लहानशा यशाबद्दल सुद्धा स्वत:ला शाबासकी देण्याची सवय ठेवा, स्वत:ला प्रोत्साहन देत रहा.
  • घडून गेलेल्या किंवा घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगातली चांगली बाजू लक्षात घेण्याचा प्रयत्न करा.
  • अपयश हा आयुष्याचा भाग आहे. त्यानं हताश होऊ नका. सकारात्मक विचार करा. पुन्हा प्रयत्न करा.




  •  योग्य त्यावेळी मदत मागण्यात लाज बाळगू नका. आयुष्यात प्रत्येकाला मदत लागते हे लक्षात ठेवा.
  •  .स्वत:ला relaxed अवस्थेत ठेवण्याची कौशल्ये आत्मसात करा म्हणजे तणावाच्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही स्थिर राहाल व आत्मविश्वास डळमळणार नाही.
  •  तणाव नियोजनासाठी आवश्यक तेंव्हा वेळ न दवडता तज्ञांची मदत घ्या. कारण तणावाखाली असाल तर आत्मविश्वास मिळवणं/वाढवणं अवघड आहे. 

सौजन्य ---- सकाळ वृत्त पेपर ....




No comments: