हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या
पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा
प्रयत्न केला तर ?...
ठरवले तर सहज शक्य आहे.
अंतरंगातून सहज
सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे.
अनंत संकल्पना आहे नात्यात
जे तुला ही कळते न मलाही
अंतर्मनात झाकताना चैतन्य प्रसवते
न अडखळता ओठांतून पुटपुटते ~~~~
अनुभूती अजूनही अलवार स्पर्शाची
आठव संगमवरी देह शिल्पाची
त्या चेतनामयी भावूक क्षणांची
पौर्णगौर अशी सावळ्यास मोहवणारी ~~~~~
अवखळ मनाला घाल बांध
फुलपाखरां मागे धावू नको लगबग
खाच खळगे येतील अवचित
उधळनाऱ्या वार्यासोबत जीवन होईल बेरंग ~
उगी भासवू नको मन सैरभैर
खेळ मस्ती शिशारी येईस्तोवर
उरलेत अवशेष माझ्या लेखी भकास
शब्दांचे मोल पडक्या वाड्यासमान ~~~~~
भावमुद्रा बदलवून बरसतेस
नजरभेट घेवून झपाटतेस
किती सहज मती गुंगवतेस
तुला नाही कळायचं म्हणून सावरतेस ~
राधे __/|\__ कृष्ण !! श्री स्वामी समर्थ !!
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment