Thursday, October 23, 2014

सत्य आणि आभास यात गल्लत करू नका -- दीपिका पदुकोण

-*-*-*-*-*  सत्य आणि आभास यात गल्लत करू नका ---
                                                                      दीपिका पदुकोण ....... 

                                               अनुवाद्क -- सौ. संगीता शेंबेकर ......
 
मध्यंतरी  अभिनेत्री दीपिका पदुकोण .... यांचे वर मेडिया ने विचित्र पद्धतीने केलेल्या शुटींग बाबत जेव्हा दीपिका पदुकोण यांनी त्यांचे मत प्रदर्शित केले . त्या बाबत .....

फेसबुक वरील .... अर्धांगी या स्री विषयक आणि अतिशय जागरूक अशा ग्रुप वरील सद्स्या वं प्रसिद्ध उत्तम गायिका ..सौ संगीता जी शेंबेकर ... यांनी याचे मराठी तून केलेला अनुवाद अगदी जसाच्या तसा ...


शरीरप्रदर्शन, शरीरप्रदर्शन..म्हणजे काय नेमकं....माणसाला शरीर आहे आणि वातावरणापासून संरक्षणासाठी वस्त्रं आहेत....त्याच 
वस्त्रांना नंतर लज्जारक्षणासाठी म्हणून म्हटलं गेलं....ही लज्जा म्हणजे नेमकं काय...
स्त्री पुरुष दोघांना जवळपास सारखीच शरीररचना दिलेली आहे फक्त जननेंद्रिय सोडल्यास....दोन हात दोन पाय डोकं, केस तोंड 
इत्यादी.....स्त्रियांना स्तन असतात...ही नैसर्गिक रचना आहे....हे झाकणं आणि उघडं टाकणं यासंबंधी एवढी गुंतागुंत का...एवढा संकोच का...एवढी चर्चा का....
आरामदायी कपडे घालण्याकरिता पुरुष बनिअनवर फिरतो..चड्डीवर फिरतो...एक जननेंद्रिय झाकून बाकीचं सगळं अंग तो उघडं टाकू शकतो..टाकतो...
मग स्त्रिच्या बाबतीतच ह्या सगळ्याचा बाऊ का....
स्तन आहेत स्त्रीला तर आहेत.......ते दिसले थोडे किंवा अधिक....त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे...तो अवयव लाज वाटण्यासारखा आहे का.....जे आहे ते नैसर्गिक आहे...पुरुषांना स्तन नसतात पण निपल्स असतातच ना.....आणि ते दिसतातच ना......
आता आता पर्यंत स्त्रिया आपल्या बाळाला सार्वजनिक ठिकाणी देखील उघड्यावर आपलं दूध पाजत बसायच्या...घरात, एकत्र कुटुंबात देखील ....आणि कुणालाही त्याचं फारसं काही वाटत नसे....(विकृत माणसं सोडून..) आता तर त्या पण दिसत 

 नाहीत...आणि त्यामुळे त्या अवयवाबद्दलचं फाजील कुतुहल अधिकच वाढतंय...जितकी वस्तु झाकलेली तितकं त्याचं कुतुहल 
 अधिक असतं...  जितका याबाबतीतला मोकळेपणा वाढेल, बघण्याची सवय होईल तितकं त्याबद्दलचं अवास्तव कुतुहल कमी होईल....   
पुरुषांची उघडी शरीरं बायकांना नेहमीच बघण्याची सवय असते आणि म्हणूनच कदाचित बायकांना पुरुषदेहाचं अवास्तव कुतुहल नसतं, जितकं पुरुषांना स्त्रीदेहाबद्दल असतं....
 
पुर्वी लहान मुलं पण चांगली पाच आठ वर्षांची होईपर्यंत उघडी नागडी फिरत असत...अगदी मुली देखील ...परंतु आता अगदी जन्मलेल्या बाळालाही असं नागडं सहसा ठेवलं जात नाही.....
 
त्यामुळे पुर्वी लहानपणीच माणसांना मुलामुलींमधला भेद समजायचा...सहजपणे, नैसर्गिकपणे...आता तो लवकर समजत नाही..
 
माझा एक मित्र मला यासंबंधी म्हणत होता की त्याच्या मुलाला दहा बारा वर्षांचा होईपर्यंत मुलामुलीत नेमका काय फरक असतो ते माहीत नव्हतं आणि ते त्याने त्याला म्हणजे आपल्या बाबाला एकदा विचारलं होतं...
 
मग आज मुलांना कळतं ते फक्त पोर्नोग्राफी मधून, चित्रांमधून आणि नेटवरच्या अनधिकृत साईट्सवरून...आणि त्याबद्दलचं 
कुतुहल वाढत राहतं...
आपण नैसर्गिक वागणं, राहणंच सोडून देतोय....शरीरं झाकण्याचा अतिरेक करतोय....त्याबद्दल अतीआग्रही राहतोय असं वाटत 
 नाही का...
 
पुर्वी बायका पण गावाकडे उघड्यावर आंघोळी करायच्या...नदीवर, मागच्या अंगणात...पदर गुंडाळून...आणि कुणाला फारसं काही 
वाटत नसायचं....
 
माणसं सहज नैसर्गिक वागत होती...फाजील कुतुहल नसायचं...परंतु आता उलट विकृती वाढताना दिसते....
 
यावर विचार होणं गरजेचं आहे मला माहीत आहे ...माझी
 
ही मतं धाडसी आणि न पचणारी आहेत....परंतु विचार करायला काय हरकत आहे यावर..........

आज सकाळी दीपिका पडुकोण हिनं आपल्या चाहत्यांना उद्देशून फेसबुकवर लिहिलेल्या पत्राचा भावानुवाद.
"
एखाद्या स्त्रीला समागम करायचा असेल तर त्याची एकच खूण खरी. ती म्हणते-हो’.
आता मी अशी ओळ लिहून सुरुवात का केली? बलात्कार, भीती आणि वेदना यांचा लवलेश नसलेला एक सुखी समाज बनवण्यासाठी, काही प्रकारच्या लोकांच्या विचारात बदल घडवायचा आपण सारेच सतत झटत असतो.
माझ्या व्यवसायात मी कुणी नवखी नव्हे. हा व्यवसाय मला खूप श्रमायला लावतो. एखाद्या भूमिकेत पायापासून डोक्यापर्यंत अंग झाकून वावरायचं असतं. तर एखाद्या भूमिकेत पूर्ण नागवं असावं लागतं. त्यातली कोणती भूमिका मी करायची ही निवड अभिनेत्री म्हणून माझीअसते. कृपया लक्षात घ्या, ते पात्र असतं. ती खरी मी नसते. जी भूमिका मी निवडली असेल ती अधिकाधिक परिणामकारकरित्या रंगवणे हे नटी म्हणून माझं रोजचं काम आहे.
कृपया चुकीचे अर्थ काढू नका. माझी कळकळ समजून घ्या. स्त्री- पुरुषांच्या अवयवांबद्दल मी बोलत नाहीये. एकीकडे आपण स्त्री समानता आणि सबलीकरणासाठी लढत असतांना वाचकांचं लक्ष खेचण्याच्या नावाखाली एक प्रतिगामी प्रवृत्ती काम करते, त्याचा त्रास होतो. अशा वृत्तीविरुद्ध मी वेळोवेळी आवाज उठवला आहे.
पुरुषप्रधान समाजात एखादी स्त्री पुढे येऊ पहात असेल तर त्याचं खरं तर स्वागत करायला पाहिजे. पण आपण सत्य आणि आभास यात गल्लत करतो. समानतेच्या वर्षानुवर्षाच्या प्रयत्नांवर बोळा फिरवतो. एक वर्षापूर्वी झालेल्या अपघाताबद्दल कुठेतरी आलेल्या एका लेखाचा आधार घेऊन आपण त्याची हेडलाईन करतो, ‘‘अरे देवा, ही तर दीपिकाची उघडी छाती!’’ अशी हेडलाईन करुन आपण वाचकांना खेचण्यासाठी त्यांच्या मनात मागास-प्रतिगामी विचार कोंबायला सुरुवात करतो.
एखाद्या नटीचं अंतर्वस्त्र एखाद्या वेळी सुटू शकतं. कुठल्याही बाईचं ते होऊ शकतं. ती काही तसं करायच्या उद्देशाने ते करीत नसते. अशा वेळी त्याकडे डोळेझाक करण्याऐवजी आपण ते चित्र मोठं करुन त्यावर वर्तुळ आखून बाणाने ते दाखवीत त्याची हेडलाईन करतो, हे काय आहे? आम्ही नट्या म्हणजे माणूस नव्हेत का? एखाद्या पुरुष नटानं एखाद्या कार्यक्रमात शर्ट काढून आपले एटपॅक अ‍ॅब्ज दाखवले तर आपण त्याचं कौतुक करतो, मत्सर करतो, पुन्हापुन्हा पहातो. पण तो फोटो दाखवतांना त्या नटाच्या ‘Crotch' वर गोल करुन त्याच्या सस्त्या हेडलाईन्स नाही करीत!
माझ्या शरिराचा उत्सव करण्यात मला वावगं वाटत नाही. एखाद्या भूमिकेची गरज असेल तर पडद्यावर वाट्टेल ते करायला मी कधी लाजले नाही. पुढच्या एका सिनेमात मी बार डान्सरचा रोल करते आहे. या पेशातल्या बाईला तर तिचं शरीरच लोकांच्या भुका चाळवायला वापरावं लागतं. माझ्या ब्राच्या कपची साईज आणि मांड्यांचा परीघ यावर त्या भूमिकेच्या अनुषंगाने कितीही चर्चा करा. त्याला माझी ना नाही. पण भूमिकेच्या पलिकडे दीपिका पडुकोण नावाची मी स्वतंत्र स्त्री आहे याचा आदर तुम्ही राखलाच पाहिजे.
प्रश्न फक्त कुणाचे स्तन, शिश्‍न किंवा अन्य अवयवांबद्दल बातम्या देण्याचा नाही. संदर्भाचा आहे. आपला माल खपवण्यासाठी संदर्भ सोडून अशा बातम्या देणं चूकच आहे. सार्‍या समाजाचा स्त्रीविषयक दृष्टीकोण बदलण्याची नितांत गरज असण्याच्या काळात तर नक्कीच.


माझ्यासाठी हा विषय संपला आहे. प्रत्येकाला त्याचं मत असू शकतं. मी या प्रकरणी पुढे काही करणार नाही. त्यातून काही चांगलं निष्पन्न होण्याऐवजी कदाचित भलत्याच नकोशा हेडलाईन्सविकल्या जातील."
आपण सगळेच एकमेकांबद्दल प्रेम, सन्मान आणि आदर बाळगू या. चांगलं जगू या. हसू या. प्रेम दाखवू या.
मूळ लिंकhttps://www.facebook.com/DeepikaPadukone/posts/722345794506193?fref=nf

LikeLike · 

Wednesday, October 22, 2014

मोहक दिवाळी सकाळ



:)
मोहक दिवाळी सकाळ
राधे __/|\__कृष्ण


समृध्दीच्या कणाकणात सजावी, नटावी दीवाळी......!!
हसत, नाचत बहरत यावी दीवाळी...!!

उत्कर्षाचे मृदुगंध उधळीत यावी ....!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे......!!
श्री राधे कृष्ण लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.......!!
मांगल्य अन समृद्धीने अवघे अंगण तुमचे उजळावे ........!!
सर्व स्नेही बंधू भगिनींना वं
आपल्या परिवार आणि स्नेही जनास
 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
कैलास मांडगे वं परिवार

राधे __/|\__कृष्ण

Sunday, October 12, 2014

अनामिक प्रेमपत्र


टपाल दिना निमित्त ...  अनामिक प्रेयसी ला लिहिलेले काल्पनिक

:::  प्रेमपत्र  :::

                                                                      कैलास मांडगे .....

प्रिय सखी  प्रांजल .....

                        एवढं दचकायला काय झालय हो तुलाच लिहिलेय .......

मान्य आहे खूप मोठा काळ गेलाय आज आपण दोघे आपल्या आयुष्यात सुखी आहोत . पण नाही ग तूच तर सारखं म्हणायची नं,” नाही रे एवढं सोप्प नसतं विसरणे..... बरोबर होतं तुझं अगदी मनापासून बोलायचीस तू .... आताशी खूप जाणवतय ग ..

            कधी एकटा असलो आणि हिच्या शी वाद झालेत न तर सारखी तुझी उणीव जाणवत रहाते बघ .


 मग आठवतात सारे क्षण तुझे खळखळून हसणे ... बोलणे ... सुरुवातीला तर किती शिष्टपणा करायचीस ... अर्थात त्याला कारण ही तसे होते तुझे रूप माझ्या पेक्षा किती तरी छान .  माझ्याशी नेहमी अंतर ठेऊन रहायचिस मला सारखे ते टोचायचे . पण काय असेल तेव्हा माझा हेतू प्रेम वगैरे असे काही नव्हता . पण तू मला खूप आवडायचीस् एवढे मात्र खरे . पण एकाच कॉलनी त असल्या मुळे काही न काही निमित्ताने तुझी भेट व्हायचीच आमच्या समोरची शैला  सारखे मला बोलायची पण काय असेल तिच्याशी मला बोलायला आवडतच नसे. पण संगीता येवला , रमा नाडकर्णी ,उज्वला पेंडसे ,ठाकरेंची ज्योस्त्ना ,दीड शहाणी उषा पाटील हां तुमचा ग्रुप एकदम जोरात ..... कॉलेज ला तुझा वर्ग वेगळा आणि माझा वेगळा तरी प्रत्येक तास सम्पल्यावर मी १ मिनिट का होईना तुझ्या वर्गावरून चक्कर मारायचोच. पण ग्याद्रिंग ला माझे कविसंमेलन आणि नाटका  चे वेळी  जेव्हा माझ्या मैत्रिणी माझ्या बद्दल बोलायच्या तेव्हा तुला राग यायचा त्यांचा मग तू कॉलेज बसमध्ये मला जेव्हा पुस्तक चांगले आहे वाच असे सांगून पुस्तक दिले .. आणि घरी उघड येथे नको . तेव्हा घरी गेलेनंतर पुस्तक रुपाने मला माझी प्राची मला गवसली होती हे सांगायला नको हे तुला ही माहीत आणि मला ही माहीत .


             ३ वर्ष कसे भर्रकन निघून गेले ते कळले देखील नाहीत आणि त्या आठवणीची शिदोरी आज ही मी जपून ठेवलीय ... असु दे .,  गेलेत ते क्षण राहिल्या त्या आठवणी ... तुझ्या बाबांची बदली झाली जाताना दोघे ही रडलो भावना खूप अनावर झालेल्या पण काळ कुणासाठी थांबत नाही ... पण वाटले नव्हते आयुष्यात पुन्हा अशी अचानक भेट होईल झुकर बाबाने पुन्हा भेट घडवली  ...

            २२ ऑगस्ट २०१० चा दिवस मला सोन्या सारखा ठरला आणि माझी हरवलेली प्राची मला गवसली .... विशेष म्हणजे तुझे आडनाव बदललेले असल्याने मी ओळखू नाही शकलो पण माझ्या कविता वरून आणि माझ्या लेखनातील शुद्धलेखना वरून तुला अंदाज आला आणि सौ प्रांजल काटे ....सावळ्या ची आणि  प्राची ची भेट झाली .

               हे सगळं काही अनपेक्षित होतं विश्वास बसत नव्हता .... २ दिवस डोळ्याला डोळा नव्हता ... त्यात काय झाले माहीत नाही तू रात्री मला बोलली .... तुझी ती मी नाही ........ मला अजून खूप धक्का बसला ... क्षणार्धात लाव्हारस अंगावर पडावा अशा वेदना झाल्या ..... पण जेव्हा तू व्यक्त झालीस गम्मत केली .... तुम्हाला चेष्टा ही कळत नाही का ? तेव्हा कुठे मी नॉर्मल झालो ...

तसे तर पूर्वी जसे आपण  रेखीव नक्षीदार कागदा वर एकमेकाला  चिट्ठी लिहायचो त्या चिट्ठी चा सुगन्ध ही घ्यायचो ... माझ्या चिट्ठी ला सुगंधी  वास येत नसायचा म्हणून तू मला खिजवायचीस.. मग मी सेंट शिम्पायचो..पण कागद खराब व्हायचा ... पण नंतर तूच मला सुगंधी चालणारा पेन भेट म्हणून दिला  मग मला एक एक सारं कळत गेलंय.... आठवतं ~~~~ सारं सारं आठवतं... खूप आठवणी आहेत बघ ... एकटा असलो न ... काही वेळा उदास ही होतो आणि काही वेळा मीच माझ्याशी हसतो ......... होय ......खरच ......... पण बघ जसा जसा काळ सरकतोय तसं तसं ते धुसर होण्या ऐवजी गडद होत जातंय  .........

            पण प्राची  तुझा जन्मदिवस  आणि यावेळी मी सर्वात आधी तुला शुभेच्छ्या देणं हां तर तुझा हक्क .. पण पुन्हा तू गैरसमज करशील म्हणून तुझा हट्टी आणि स्वाभिमानी स्वभाव मला माहीत असल्याने मी तुझ्या कडून उत्तरा ची वाट पाहिली आणि खात्री केली की प्राची मला सांगते की नाही . पण खरोखर अभिमान आणि गर्व वाटला तुझा .

पण जन्मदिवसाच्या शुभेछ्या देण्या साठी तुझे फोटो पाहिले त्यात तुझे त्यावेळचे फोटो पाहून खूप भडभडून आले पण बाकीचे तुझे आयुष्यातील क्षण तसेच  तुझे मिस्टर श्री काटे  साहेब ... तुझा संसार , तुझी मुले घरदार  आणि इतर तुझ्या आयुष्यातील सुखद क्षणांचे छायाचित्र / फोटो पाहिल्या नंतर खूप समाधान वाटले . बस तू एवढी आनंदी आहेस अजून काय हवे आयुष्यात . खूप भरून पावले परमेश्वराचे खूप आभार मानले की प्राची ला सुखी केलेस या पुढे ही कर . तिला असेच हसत मुख ठेव .


            प्राची  तुला विशेष आणि आश्चर्य वाटत असेल की हां काय लिहितोय काय बडबडतोय एवढं कसा बेईमान झालाय आपले प्रेम ... घेतलेल्या आणा भाका . एकांतात घालवलेले सारे क्षण , सारे समर्पण याचे काहीच मोल नाही का ? हे इतके सहज कसे विसरू शकतो ?

            होय अगदी बरोबर प्राची  .... पण तुझे मिस्टर काटे  साहेब .... भारतीय मिलिटरीत  आहेत .... हे माझ्यासाठी महत्वाचे आहे आपले प्रेम नाही . एका शूरवीराची तू पत्नी आहेस की जो माझ्या मायभूमी साठी इतक्या लांब सीमेवर  योगदान देणेसाठी बांधील आहे . आणि मी माझ्या प्रेमासाठी त्याच्या सुखी संसारात माती कालवून ह्या मायभूमी शी द्रोह कधी ही करणार नाही . आणि हो समझा जरी काटे  साहेब देशाची सेवा करीत नसते ते एक सिविल सेवेत असते तरी मी तसे केले नसते कारण प्रत्येकाचे सुख हे सुख असते .... योगायोगाने तुझे घर माझ्या गावापासून जरी जवळ असले तरी ही मी तुला कधी ही भेटणार नाही. आणि माझे गुरु मला कधी ही तशी परवानगी देणार नाहीत .   हो एवढे मात्र नक्की की प्राची  माझी सखी आहे पण ती सौ काटे  सुद्धा आहे . ति माझ्या साठी जीव की प्राण आहे . तिच्या वर माझे मनापासून सकारात्मक प्रेम आहे पण त्यात वासना नाही . प्राची  वर माझे निर्मळ शुद्ध आणि सात्विक प्रेम आहे आणि राहील .... अगदी अनादी अनंत कालपर्यंत ..........

                                    

 
     राधे __/|\__कृष्ण

 

                                                                        तुझाच ..........कैलास .......  

 
टपाल दिना निमित्त हार्दिक शुभेछ्या ........

Thursday, October 9, 2014

रेडिओ -- मंदाकिनी रासकर

रेडीओ

                         सौ. मंदाकिनी रासकर 

       पुर्वीच्या काळी मनोरंजनाचे साधन म्हणून सर्वसामान्य लोकांचा फक्त रेडीओ वरच जास्त भर असायचा .
रेडीओ सर्वांनाच खुप प्रिय असायचा . टी . व्ही . फक्त एखाद दुसऱ्या चांगल्या सधन कुटुंबांमध्येच असायचा . ज्यांच्या घरात टी . व्ही . ते लोकं खुप श्रीमंतामध्येच गणले जायचे . मला चांगले आठवते मी लहान होते तेंव्हा टी . व्ही . वर सिनेमा पहायचा असेल तर ज्यांच्या कडे टी . व्ही . असेल त्यांच्या कडे आम्ही मैत्रिणी
25 पैसे एकीचे देऊन अर्धा सिनेमा पहायचो आणि पुन्हा जर घरच्यांनी सोडले तरच पुढचा अर्धा सिनेमाही 25 पैसे देऊन पहायचा . तेंव्हा मोजकेच चित्रपट आणि एखादीच मालिका असायची आठवड्यातून . चित्रहार आणि छायागीत खुप आवडायचे . पण तेही एखाद्याच्या घरांत बळच डोकवून पहावे लागायचे . पण रेडीओ मात्र आपला हक्काचा सोबती असायचा आवडता . सकाळपासून ते रात्री झोपे पर्यंत थेट . विविध भारती वरील सर्वच कार्यक्रम खुप छान असायचे . गाणी ऐकता
ऐकता आणि गुणगुणत कामं करायला खुप उत्साह वाटायचा . आठवड्यातून एक दोन वेळा अभिनेत्यांच्या मुलाखती
, किंवा सिबाका गीतमाला , बालोद्यान किंवा एखादे सुंदर रोज लागणारे नाटुकले खुप छान वाटायचे ऐकायला . आम्ही अगदी न चुकता कान टवकारून नाटकं ऐकायचो . खुपच छान दिवस होते ते !! अजुनही आठवतात मला . नंतर माझे जेंव्हा लग्न ठरले तेंव्हा मला कळले कि अहमदनगरला विविध भारती लागत नाही . मला खुप वाईट वाटले होते तेंव्हा हे ऐकुन . मी विचार करायचे आता मला कसे करमणार सासरी ? लग्न होईपर्यंत मी मनसोक्त रेडीओ ऐकून घेतला होता . खरंच मुलींना लग्न म्हटलं कि खूप गोष्टींची तडजोड करावी लागते . वातावरणाशी मिळते जुळते घ्यावे लागते लग्नानंतर . त्यात मला हे एक रेडीओचे माझ्या आवडीचे बलिदानच दयावे लागले होते . कालांतराने मी
सासरी रुळले देखील लवकर . हळूहळू विसरही पडला रेडीओचा . पण नंतर बरीच मनोरंजनाची साधने आली . रेडीओवर देखील अनेक वाहिन्या आल्या छान छान . आता विशेष जास्त काहीच वाटत नाही कशाचेच . कारण आता ईतकी साधनं आहेत मनोरंजनाची आणि भरपूर वाहिन्या आहेत . माणसाला एखादी गोष्ट मुबलक प्रमाणात मिळू लागली कि तिची किंमत राहत नाही . तसेच आता रेडीओ आणि टी . व्ही . चेही झाले आहे .

पण तरीही अजुनही मला काम करता करता रेडीओ वरील गाणी ऐकायला खुप आवडते . पण सध्या रेडीओ वरती अर्धा तास जाहिराती आणि त्यात चुकून एखादं गाणं लागतं !! खुप कंटाळा येतो आता रेडीओ ऐकायचा . कोणे एके काळी माझा खुप आवडता असणारा , माझा लाडका रेडीओ आता नावडता होतो कि काय ? असेच वाटू लागले आहे मला . पण असे घडू नये असे
मला मनोमन वाटते . कारण शेवटी कितीही झाले तरीही रेडीओ माझ्या मनांत कायम घर करून राहिलेला आहे .

. . . .
                                   मंदाकिनी रासकर .

 
            राधे __/|\__कृष्ण 

                                 !!  श्री स्वामी समर्थ !!