Friday, November 27, 2015

मुक्तपक्षी भाग क्रमांक - 24



                   आठव किती जपायचे
            वर्तमान हेच मोल नात्यांचे
     प्रेमात परिमल जपायचे
जगरीत सोबत चालायचे ~~~






     


         आठवांच्या अल्हड़ लाटा 
               आलिंगन देताना ज़ेपावतात 
                     तूच तर राधा तुजाच हां कान्हा 
                           आसुसलेले मन भावविभोर हळवेपण ~~~ 






                अलबेली तू सांजबावरी
            सर्वार्थाने  स्व:तस शोधणारी
        सैरभैर उगीच वाटणारी
    क्षणोक्षणी चाहूल  कासाविक होणारी 





झेंडा फड़फड़तो तुज्या भक्तीचा
   अधर्माची लाठी नारी तू नारायणी
           भक्तीने लगाम लागतो दुर्गुणाना
             अम्बे तुज़ा महिमा वर्णावा किती ~~~~~









ईवल्याश्या मनाचा किती पसारा
    पौर्णचन्द्र प्रीतीत धागा नात्यांचा
        मुक्या  भावनांना  नजरेत वाचताना 
            मिटुन पापण्या रोमरोम भिनणारा ~~~



जाणते अजाणतेपणी समोर तीच छबी
    आकाश आभासात साऱ्यांमधे तू
         उगाच सावकाश शिकलो हे सार
           जपून वेदना उरात बाळगतो ~~~~




             जेव्हा रात्र मोहरताना लाजते
           धुंद  कळ्या टपोरतात
      प्रितीचे गहिरे पदर  न्याहाळते
बघ चांदण्या कशा  टिमटिमतात ~~~~





जल्लोष आज मैफिलीचा न्यारा होता
  शब्दा शब्दाना बहर  होता
    हर एक भावना मोती होत  होता  तिच्या प्रेमाचा कैफ मदहोश करीत  होता~~~~~ 




























राधे __/|\__ कृष्ण                              !! श्री स्वामी समर्थ !!


                                                         कैलास मांडगे 


..









मुक्तपक्षी भाग क्रमांक - 23

अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे








खरी नाती , निस्सीम बंध  मिळतात
       पण कितीतरी पावसाळे जातात
            जुळणारे वेळी अवेळी  सुखभरे
              अव्यक्त क्षण मोहन टाकतात



शब्दांच्या अर्थाचा अनर्थ नको
  किती दिवसात लाभला निवांत
     किती उष्ण पण मोहक हां स्पर्श
       शहारून  उठू दे चांदण्यांवर तरंग ~~~~




रोमांटिक सुचायला प्रेमच
    करायला हवे कशाला
       मैत्रीतही निर्मळ मोहक नात  रुजत
         मैत्रीच्या नात्यात क्षिति मनास होईल का ?





राजस बावरी ग राधा
    अनुराग अजूनही तस्साच ताजा
         जसे कुबेराचे फुलले भांडार
            रोमरोम स्पर्शता  दाटली लाली गालाला ~~~



      मनापासून विश्वासाने प्रेम केलत 
    तर नक्कीच निर्व्याज प्रेम मिळते 
  प्रेमाची शाई असते आई 
बासरीच्या सुरात गुंग होणारी राधाई ~~~ 




राधे __/|\__ कृष्ण                              !! श्री स्वामी समर्थ !!
                                                         कैलास मांडगे 




Friday, November 6, 2015

----- एक कातर वेळ ----

----- एक कातर वेळ ----

                                                         लेखिका -- सई (संतोषी साळुंके )


एका प्रेयसीची तिच्या मनातली अशी हि एक कातर वेळ .........

सरता सरता न सरणारी वेळ म्हणजेच कातरवेळ .
दिवे लागणीच्या वेळेस कातरवेळ म्हणण्याची जुनी पद्धत आपल्या कडे आहे .एक अशी वेळेची कातर ज्यात दिवस आणि रात्र एकमेकांना दुभागतात 
आणि त्याचा मध्य गाठणारी वेळ म्हणजेच कातर वेळ .
त्याचा अर्थ आणि अनुभव प्रत्येकाला माहित असतो , पण काहींना कळतो काहींना कळत नाही . कारण माणूस किती हि हुशार विद्वान असला तरी सायंकाळ हि कोणाचीच चुकचुकल्या शिवाय सरत नाही .
एक अशी घटका ज्या घटकेत कोणाची तरी ओढ लागते
,जीव कासावीस होतो , उदास वाटू लागतं किंव्हा क्वचित लाजरस हसू येतं . त्यात पावसाची भर हा उत्तम प्रकार आहे . अशा संध्याकाळी ओल्या हवेत श्वास घेताना अंगावर येणाऱ्या त्या शहाऱ्याची भावना आजवर कोणी स्पष्ट केली नाही ,किंबहुना ती करू हि शकणार नाही . गारवा , हवेतला ओलावा सहज अंगाला स्पर्श करून जातो आणि मनाला थोडा विसावा देऊन जातो . मला खूप आवडते हि पावसातली कातरवेळ .
थंड ओली आणि अंगावर रोमांच फुलवणारी हि कातरवेळ सगळ्यांनाच आवडेल पण ती उपभोगायला तसं मन हवं नं……
प्रेम म्हणजे फक्त स्पर्श नसून हा मनातून जोडलेल्या प्रेमाचा अनुभव सुधा असु शकतो . ज्याला हा अनुभव घेता आला त्याला प्रेम समजलं आणि प्रेम समजल म्हणजे जगणं हे आलच . हे असे छोटे छोटे आनंद माणसाने अनुभवावे कारण यातूनच नातं घडत जातं फुलत जातं .
निसर्ग हा उत्तम प्रकार आहे स्पर्श समजण्याचा . अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या त्याच्या कडून आपण शिकू शकतो ,समजू शकतो ,अनुभवू शकतो . त्याच्या प्रत्येक गोष्टीत प्रेम आहे फक्त ते अनुभवणार मन हवं .विचार करता करता माझ लक्ष त्या संध्याकाळच्या दिव्याकडे वेढल होत .
तो सुबक शांत लखं चमकत होता . त्याची ती स्थिरावलेली जोत सर्वत्र कोवळा प्रकाश पसरवत होती आणि मन प्रसंन करत होती . बाहेर बऱ्यापैकी गारवा होता . मी ओट्यावर बसून काहीतरी विचार करत होते . दिव्याच्या बाजूने अगदी सरळ काळी रांग पुसटशी दिसली . मी ते काय आहे पाहण्या साठी जवळ गेले तर काळ्या मुंग्या अगदी तालात सरळ दिशेने पुढे पुढे जात होत्या .
त्या प्रकाशात सरळ जात तर होत्याच पण अंधारात हि रस्ता न भरकटत चालत होत्या . कुठे तरी पुस्तकात वाचलं होत . मुंगी चालताना तिच्या शरीरातून एक प्रकारच द्रव सोडते ज्याला फेरोमोन असे म्हणतात . त्यामुळे त्यांना एकमेकांशी संपर्क कारण सहज सोप होत . तसेच आपल्या मागचे साथीदार रस्ता भरकटू नयेत आणि आपल्या सोबतच राहावेत हि भावनाही तितकीच तीव्र असते .
तितक्यात एक मुंगी इकडे तिकडे भरकटलेली मला जाणवली . पाहिल तर ती पाण्याच्या थेंबा जवळून गेली होती म्हणून रस्ता भरकटली . कारण ते फेरोमोन पाण्याने विरघळल होत . ती घाबरून सैरबैर पळत होती . मी हळूच हात पुढे केला तर ती माझ्या हातावर चढली आणि मी तिला त्या रांगे जवळ सोडल .

तर ……………. तर ती मिसळली त्या रांगेत जणू कधी ती दुरावलीच नव्हती अचानक त्यांचा एक भाग झाली होती ...
माणसाच हि असच काही होत असेल का .………?
तोही कोणा न कोणा च्या मनात आठवण नावाच फेरोमोन पेरत असेलच न………?
ती व्यक्ती रस्ता भरकटू नये आपल्या सोबतच राहावी अशी माणसाची हि तीव्र भावना असून हि ती व्यक्ती का टिकत नाही .…………….? 
ती दुरावलेली व्यक्ती परत अशी आपल्यात मिसळत असेल का ………….?
तितक्याच सहज आपल्या आयुष्याचा भाग होत असेल का .…………?
ती व्यक्ती पहिल्यांदा जेंव्हा भेटेल तेंव्हा कशी वागत असेल .………….?
मी बेचेन होऊन माझ्या खोलीत जाऊन कपाटातील एक बरेच दिवस बंद असलेला डबा उघडला .
त्यात होत माज गुपित खूप वर्ष जीवाशी साठवून ठेवलेलं जपून ठेवलेलं .ते विरघळलेल पिंपळ पान आणि एक दगड ज्याला कोरीव काम करून हृदयाचा आकार दिला होता . त्यात होते काही मोती धाग्यात पिरून त्याने माझ्या गळ्यात बांधलेले .
आणि माझे डोळे पाणावले त्याचा आठवणीने . मी तुटून निराश होऊन एकटीच पुटपुटले 
कुठे दुरावलास तू ……………? 
वाट पाहते मी तुझी .……!
खूप…………….. खूप आठवण येते रे तुझी आज .……… ! 
आणि मी कोसळले खाली …………. सगळ अस्ता व्यस्त पसरलं . बरेच वर्ष ठेऊन धागा कच्चा झाला होता आमच्या नात्या सारखा आणि त्यातले ते मोती खोली भर झाले होते विखुरले होते अगदी माझ्या मनासारखे . माझे अश्रूही आता न थांबता वाहू लागले . मी कासावीस होऊन खचून रडू लागले . कशी होईल भेट आपली ……!
का दुरावलास इतका माझ्या पासून तू …….? 
मला हवा आहेस तू शेवट पर्यंत …………?
शाळा सुटल्यावर आम्ही त्या तळया काठच्या झाडा जवळ भेटायचो .एकदा त्याने माझ्या साठी काही मोती आणले होते स्वत ओउन माळ करून . त्याच तळया काठी माझ्या गळ्यात घातले होते . आठवण म्हणून दिलं होत पिंपळ पान .
आणि तळ्यात भेटलेला दगड झिजून दिलं होत मला एक रेखीव हृदय . खूप आवडायचं मला त्याच अस असण . माझ्यासाठी सतत काही तरी नवीन कारण . आम्ही खूप गप्पा मारायचो .तासान तास एकमेकात रमायचो . खूप प्रेम होत आमच एकमेकांवर. मला आज हि आठवत तो दिवस .
आम्ही सगळे सजून १० वीच्या निरोप समारंभासाठी आलो . थोड बोलणं झाल मन शांत झाल . वेळ झाली ती खरच निरोप घ्यायची आणि मला तिथून निघावासच वाटेना ..

आज आम्ही काही बोलोच नाही आमच्या डोळ्यातून फक्त पाणी ओघळत होत .
मला आता तुला भेटता नाही येणार ………. मी मी बाहेर चालोय शिक्षणा साठी .……!
पण ……… मी हे एकूण संपले होते . पण त्याने मला दिलासा दिला होता . कि तो परत येईल .

शुभंभवतु ......

Tuesday, September 29, 2015

मुक्तपक्षी भाग क्रमांक - 22

हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.

अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे.





क्षितीज कसं भरभरून दाटलं
       हे तर शाश्वत अनंताचं नातं
           प्रीतबंधात कसं नाही भेटणं
              तूच पटटराणी .... नको करू देवदास ~~~






       गर्द मध्यरात्री भाव फुलतात
                खिडकीतून चंद्र गुपित सांगता
                      अंधारात लय अलवार साधतात
                                लय श्वासांची तनमन मोह्ररतात ~~~~





         
              मंद तेवत असते
                  दिपमालेतील वाट
                         नको पेरूस संशयाचे धुके
                               अखंड तेवू दे प्रेमळ साथ ~~~~~



सुगंधी मातीत पेरले शुद्ध बीज
        नीट रुजतेय ... कारण निसर्गाची साथ
            मायेचं खत घालून विश्वासाचं कुंपण
              प्रेमाचे अंकुर उमलले जपूया जीवापाड ~~~~


सुखं दु:खा सोबत जगायचे 
    सर्व कसं सोप्प म्हणून फुलायचे 
       विरहात नाही कधी जगायचे 
         नाही होऊ द्यायचे आठवणींचे ओझे ~~~






राधे __/|\__ कृष्ण                              !! श्री स्वामी समर्थ !!
                                                         कैलास मांडगे 

देहदान अमुल्य दान ......

::: देहदान :::

                                                                                                                       - प्रभाकर भिडे

कल्‍पवृक्षाप्रमाणे माणसाच्‍या मृत्‍यूनंतर त्‍याच्‍या शरिराच्‍या अनेक अवयवांचा वापर इतरांची आयुष्‍ये सुखी करण्‍यासाठी होउ शकतो. या उद्देशातून गुरूदास तांबे यांनी मरणोत्‍तर देहदानाचा प्रचार करणा-या ग. म. सोहनी यांच्‍या प्रेरणेतून 1987 साली दधीची देहदान मंडळाचीची स्‍थापना केली. तांबे यांनी चर्चा-बैठकांमधून हा विषय
अनेकांपर्यंत नेला आणि त्‍यास चांगला प्रतिसाद मिळू लागला. आतापर्यंत मंडळाचे सोळाशेपेक्षा जास्‍त सभासद असून साडेतीनशेहून अधिक व्यक्तींचे देहदान विविध वैद्यकीय महाविद्यालयातून केले गेले आहे.
जसे र.धों.कर्वे यांनी पन्नास-साठ वर्षांपूर्वी संतती नियमनाचा प्रसार करून आपण काळाच्या पुढे आहोत (प्रचंड विरोध पत्करून) हे दाखवून दिले; तसेच कै.ग.म.सोहनी यांनी तीस वर्षांपूर्वी मरणोत्तर देहदानाचा प्रचार व प्रसार पुण्याला केला होता. ग. म. सोहनी हे शाळेत सुपरिटेंडंट म्‍हणून कार्यरत होते. त्‍यांनी कोणतीही संस्‍था स्‍थापन न करता केवळ भाषणांच्‍या साह्याने देहदानाविषयी जनजागृती घडवण्‍याचा प्रयत्‍न केला. शंतनुराव किर्लोस्‍कर आणि ना. ग. गोरे यांच्‍या सहकार्याने सोहनी यांनी देहदानासंबंधीची काही पुस्‍तकेही प्रसिद्ध केली होती. मात्र त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर ते कार्य खंडित झाले. सोहनी यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन डोंबिवलीतील गुरुदास तांबे यांनी मरणोत्तर देहदान-नेत्रदान यांचा प्रसार सुरू केला. ते साल होते 1988. त्या वर्षी संस्थेची नोंदणी करण्‍यात आली.

ग. म. सोहनी यांच्‍या एक भाषणाचा वृत्‍तांत गुरूदास तांबे यांच्‍या वाचनात आला. त्‍यांना देहदानाचा मुद्दा महत्‍त्‍वाचा वाटला. त्‍यानंतर त्‍यांनी जे. जे. रुग्‍णालयासहित मुंबईतील काही रुग्‍णलयांमध्‍ये जाऊन देहदानासंबंधीची माहिती गोळा केली. त्‍यातून मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे त्‍यांनी 1987 साली दधीची देहदान मंडळाची अनौपचारिक स्‍थापना केली.
विश्व हिंदू परिषदेकडून भिवंडी येथे शिक्षण घेणार्‍या आदिवासी मुलांकरता वसतिगृह चालवले जाते. त्याची जबाबदारी 1974 सालापासून गुरुदास तांबे सांभाळत असत. वसतिगृहासाठी निधी गोळा करण्‍याचे काम त्‍यांच्‍याकडे असे. मोठ्या प्रमाणात निधी गोळा करावा आणि त्‍यातून वसतिगृहामधील विद्यार्थ्‍यांचा खर्च भागवला जावा अशी तांबे यांची कल्‍पना होती. त्याकरता त्‍यांनी जी.पी.ओ.मधील नोकरीचा राजीनामा दिला आणि वसतिगृहाच्‍या जोडीने दधीची देहदान मंडळाचे काम सुरू केले. तांबे यांनी स्वत:चा देहदानाचा फार्म प्रथम भरला. त्यांनी बरोबरीच्या मित्रमंडळींबरोबर चर्चा करून देहदान मंडळाची स्थापना करत हा विषय डोंबिवली-ठाणे-मुलुंड येथील ज्येष्ठ नागरिक संघांपुढे ठेवला. सुरुवातीला, कॉर्नर मीटिंगा, ज्‍येष्‍ठ नागरिक संघाच्‍या बैठका अशा माध्‍यमातून त्‍यांनी मंडळाच्‍या कल्‍पनेचा प्रसार केला. मग चर्चा/संवाद सुरू झाले. त्यातून प्रतिसाद मिळू लागला. तांबे यांनी तोच ध्यास घेऊन त्यांच्या घरीच कार्य चालू केले. गुरुदास तांबे यांच्‍या
रेडिओवर अनेक वेळा मुलाखती झाल्‍या.
मंडळाचे नाव ठेवताना सांस्कृतिक दृष्टीने विचार केला गेला. त्यांना वेदामध्ये एका कथेचा संदर्भ मिळाला. वृत्रासूर नावाच्या दैत्याने इंद्रादी देवांना त्रास देऊन त्राही भगवान करून सोडले. तेव्हा देवांनी भगवान विष्णूंना गार्‍हाणे घातले. भगवान विष्णू यांनी योगशास्त्रात पारंगत अशा दधीची ऋषी यांना, त्यांनी योगाच्या साहाय्याने जिवंतपणी प्राणोत्क्रमण करावे आणि त्यांच्या अस्थींचे वज्र बनवून वृत्रासुराचा वध करावा अशी आज्ञा केली. दधीची यांनी विष्णूची आज्ञा प्रमाण मानून पहिले देहदान केले! म्हणून मंडळाचे नाव दधीची देहदान मंडळअसे ठेवण्यात आले.
सध्या मंडळाचे अध्यक्ष विनायक जोशी असून कार्यवाह म्हणून सुरेश तांबे आहेत. गुरूदास तांबे हे सुरेश तांबे यांचे वडिलबंधू आहेत. काही ज्येष्ठ नागरिक हे काम नेटाने पुढे नेत आहेत.

सभासदांचे भरून आलेले फार्म वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांत पाठवण्यात येतात. वैद्यकीय महाविद्यालये सभासदांच्या नावे ओळखपत्रे बनवून देतात. म्हणजे त्या व्यक्तीचे निधन झाल्यावर तिचा देह वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात अडचण येत नाही. काही महाविद्यालये स्वत: शव आणण्यासाठी मेडिकल व्हॅन पाठवतात, तर काही त्याबद्दल मोबदला देतात. पण देह स्वीकारण्यापूर्वी शव निरोगी असल्याबद्दल डॉक्टरांचे सर्टिफिकेट असावे लागते. व्यक्तीला निधनापूर्वी काही रोग असल्यास महाविद्यालये शरीर स्वीकारत नाहीत.
महाराष्ट्रात दीडशे वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यांच्या अभ्यासक्रमानुसार माणसाच्या शरीरशास्त्राची रचना समजण्यासाठी दहा-पंधरा विद्यार्थ्यांना एक देह असावा लागतो. यावरून वैद्यकीय महाविद्यालयांना अभ्यासासाठी किती मृत शरीरांची आवश्यकता आहे हे लक्षात येते.
विज्ञान, मेडिकल सायन्समध्ये नवनवीन इतके शोध लागले आहेत, की व्यक्तीच्या निधनानंतर एक मानवी देह अनेक जिवंत व्यक्तींची आयुष्ये सुखी करण्याकरता उपयोगी ठरू शकतो. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. कारण त्याच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतो. मानवाच्या अनेक अवयवांचे रोपण इतरांच्या शरीरात करणे शक्य झाले आहे. मानवी त्वचादेखील जळित तसे अपघातातील व्यक्तींना उपयोगी पडू शकते.

आपल्‍याकडे असलेली पुस्‍तके एकदा वाचली की पडून राहतात. दधीची देहदान मंडळाकडून लोकांना आवाहन करून अशी पुस्‍तके मिळवली जातात. या प्रयत्‍नांतून मंडळाने दधीची ज्‍येष्‍ठ नागरिक वाचनालयहे निःशुल्‍क वाचनालय सुरू केले आहे. या वाचनालयात लोकांकडून दान करण्‍यात आलेली चार कपाटेही आहेत. मंडळाच्‍या सभासदांना पुस्‍तके घरी नेण्‍याची सुविधा आहे. या ठिकाणी दर आठवड्याला वामनराव नवरे यांच्‍याकडून गीतेचे वर्ग भरवण्‍यात येतात. तसेच दर शनिवारच्‍या वर्गात गीतेच्‍या एका अध्‍यायावर गुरुदास तांबे यांच्‍याकडून भाष्‍य केले जाते. याचबरोबर मंडळाकडून गेल्‍या पंधरा वर्षांपासून महर्षी दधीची देहदान पत्रिकानावाचे एक त्रैमासिकही चालवण्‍यात येते.
दधीची देहदान मंडळात सोळाशेपेक्षा जास्त लोकांनी फार्म भरुन दिले आहेत. तसेच साडेतीनशेपेक्षा जास्त व्यक्तींचे देहदान विविध वैद्यकीय महाविद्यालयातून केले गेले आहे. मंडळ दर तीन महिन्यांनी पत्रिका प्रकाशित करते व आपल्या सभासदांना विनामूल्य पाठवते. त्यामध्ये देहदानाबरोबर नेत्रदान -अवयवदान-त्वचादान, तसेच इच्छामरण यासंबंधी मार्गदर्शपर लेख असतात. यापैकी देहदान, नेत्रदान व त्वचादान यांमध्ये मंडळ साखळी निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे. समाजात जागृती निर्माण झाल्यामुळे दर तीन महिन्यांत शंभर-सव्वाशे लोक देहदानाचे व नेत्रदानाचे फार्म भरतात. मंडळ सभासदांशी संपर्क राहण्यासाठी वर्षातून दोन-तीन कार्यक्रम करते. मकर संक्रांतीचा तिळगुळ समारंभ, दधीची ऋषींची जयंती भाद्रपद महिन्यात असते, त्या समारंभात ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. तिसरा समारंभ वार्षिक सभेचा.

मंडळाने देहदान, शंकासमाधानअसे पुस्तक प्रकाशित केले आहे त्याची पाचवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
संपर्कदूरध्वनी : (0251) 2490740
सुरेश तांबे, सचिव - भ्रमणध्वनी : 9867755572
विनायक जोशी, अध्‍यक्ष – 9324324157, 2481553
पत्रव्‍यवहाराचा पत्‍ताश्री गुरूदास तांबे, ए-6/6, एलोरो सोसायटी, विष्‍णूनगर, डोंबिवली पश्चिम, 421202
कार्यालयाचा पत्‍ता- न्‍यू अनंत सोसायटी, पंडित दीनदयाळ मार्ग, डोंबिवली पश्चिम, 421202
प्रभाकर भिडे- बी-२०१ ओम यमुना माधव सोसायटी, सावरकर रोड, डोंबिवली (पूर्व), टेलिफोन: (0251) 2443642, 9892563154