Sunday, September 28, 2014

‘ संवाद आणि शांती हीच स्वास्थ्याची जननी

‘ संवाद आणि शांती हीच स्वास्थ्याची जननी ‘
                                      कैलास मांडगे ........

       संघर्ष निर्माण करणारे आपणच आणि संवाद करणारेही आपणच. संघर्ष केला तर मन त्रासेल. संवाद केला तर मन सुखावेल. त्रासाचा ताप वाढवायचा, की सुखाची शीतलता आणायची, हे आपण ठरवायचे. संवाद करावा. संघर्ष कशाला?

संघर्ष, भांडण, द्वंद्व, विरोध, मतभेद हे सर्व एक-एक छटा वेगळी असणारे, पण असुख दर्शविणारे शब्द आहेत. संघर्ष बाहेरच फक्त घडतो असे नाही, मनातही संघर्ष असू शकतो. भांडण दुसऱ्याशी होते, तसे मनातल्या मनात घडू शकते. बाहेर दोघांत घडले, तर त्याला द्वंद्वयुद्ध म्हणता तरी येते; आतल्या आत होते त्या ओढाताणीचे काय करणार? ते देखील द्वंद्वच. विरोध, मतभेद हे दृश्यण असू शकतात, आंतरिकही असू शकतात. द्वंद्व म्हणजे ओढाताण, परस्परविरोधी, लठ्ठालठ्ठी. म्हणजे अस्वास्थ्य.
कम्युनिकेशन म्हणजे संवाद. संप्रेषण. एकमेकांशी बोलणे. विचारांची देवाणघेवाण. एकमेकांना समजून घेणे.
जिथे संवाद आहे, तिथे शांती आहे. शांती आहे तिथे स्वास्थ्य आहे.
शिरीष च्या लग्नाला साधारण ४ ते ५ वर्षाचा कालावधी जाऊनही त्याच्यात नैराश्य आणि अस्वस्थता जाणवत होती . तो जेव्हा ही मला भेटतो सारखे सारखे हेच सांगतो की तुरुंगातील कैदी तरी सुखात असतील पण त्यांचे पेक्षा माझे आयुष्य वैराण झालेय .. फारच  त्रास भोगतोय ...... वैवाहिक आयुष्य नकोसं झालंय... मुलगी हळू हळू मोठी होईल ... दुसरे अपत्य जन्माला घालावे अशी तर इच्छया चं मेलीय....तन्वी (शिरीष ची बायको ) सारखी भांडत असते .... विचित्रपणा करीत असते . काय करू तेच कळत नाही .
तन्वी च्या संशयी वृत्ती मुले आई ,बहिण आणि सर्व नातेवाईक लांब गेलेते ... कुठलीही गोष्ट पोझीटीवं घ्यायला तयार नाही हर प्रकारे समझवंण्याचा प्रयत्न करून ही काही उपयोग होत नाहीये ..... शिरीष ला मी थोडे विश्वासात घेऊन विचारले की असे मोघम नको सांगू नाण्याला दोन बाजू असतात ... एका हाथाने टाळी वाजत नाही .... फक्त संशय घेते .... भांडते आरोप करते .. रोज रोज वादावादी होऊन शिवीगाळ चालते ..... म्हणजे तुम्ही दोघे सुशिक्षित असून ही असे होते ... पण नेमके काय होते .... कारणे काय नेमकी ? तेव्हा शिरीष ने जेव्हा काही उदाहरणे सांगितलीत तर आश्चर्य कारक घटना होत्या .....

शिरीष आणि तन्वी चे अरेंज्ड म्यारेज लग्न.... दोघा बाजू कडून अगदी व्यवस्तीत आनंदात पार पडले .. शिरीष ने तिला मधुचंद्रा साठी उटी ला ही फिरवून आणले ... हनिमून ला सुद्धा शिरीष ला तन्वी चे स्वभावा चे काही टोचणारे अनुभव आलेत पण शिरीष ने ते गंमत म्हणून नजरेआड केलेत.  नेहमीप्रमाणे घरी असताना आई बाबांशी .. बहिणीशी  रोज वागताना ही तिचा संशयी स्वभाव पराकोटी चा अवघड जाणवला . परिवारा तील कुणी काही चेष्टा केली की त्याला ती खाजगी गोष्टी चे लेबल लाऊन खूप भांडण करायची . आई किंवा बहिणीने कधी डोक्याला तेल लाऊन दिले तर त्यांचे वर ही संशय आणि त्या वरून ही भांडण आणि खूप आरडाओरड . शेवटी मला वेगळे रहायचे म्हणून हटट केलाय ... वास्तविक मी  एकुलता एक मुलगा पण तरीही आई बाबांनी संसार सुखाने व्हावा म्हणून आम्हाला वेगळा संसार थाटून दिलाय . पण तरी ही तन्वी मध्ये काहीही फरक पडला नाही . नवीन फ्ल्यांट मध्ये आल्यानंतर तिचे नवीनच सुरु झाले तुमचे आणि खाली रहाणाऱ्या माधुरी चे काहीतरी संबंध आहेत . तुम्ही एकमेकाकडे सारखे पहात असतात . असे अनेक स्रीयां तसेच ऑफिस मधील स्री सहकार्या वरून, कधी मित्रपरिवाराने काही छोटेखानी कार्यक्रम किंवा कुठे ट्रीप काढली तेथे तर तेथे सुद्धा तन्वी चे ती तुझ्याशीच का बोलली ... तू सारखे लेडीज कडेचं पहातो , तुम्ही खूप वेळा भेटलेले पण मला ओळखू येऊ नये म्हणून नाटक करताय ...असे अनेक प्रकारा वरून तन्वी ने सारखे वाद उकरून काढायचे आणि भांडत रहायचे ...
       मुलीचा वाढदिवस होता मी सर्वाना बोलवले बहिण आली तिला मला पाहून गहिवरून आले तिने माझी गळाभेट घेतली त्यावरून ही तिने माझ्या वडिलांना आणि बहिणीच्या नवर्याला बोलली की भाऊ असला म्हणून काय झाले तुमच्यात अशा मिठ्या मारायची संस्कृती आहे का ? अशी अनेक उदाहरणे शिरीष ने मला शेअर केलीत .........आणि या तन्वी च्या विक्षिप्त स्वभावामुळे शिरीष चे सोशल लाईफ तर उध्वस्त झालेच पण आई वडील आणि नातेवाईक यांचेकडे जाणे ची सुद्धा चोरी झाली .

       साधारण १५ ते २० दिवसानंतर शिरीषचा मला निरोप मिळाला की तन्वी खुपच आजारी आहे आणि तिला  दवाखान्यात आडमीट केले .  मी त्वरित हॉस्पिटल ला पोहोचलो ..... शिरीष ने सांगितले की हल्ली तन्वी खुपच आक्रमक झाली होती ... रात्री व्यवस्तीत झोपत ही नव्हती ....सारखे बडबड आणि विचित्र चं वागत होती .... आज ती सकाळी अचानक चक्कर येऊन पडली .. मी त्वरित तिला हॉस्पिटल ला घेऊन आलोय . डॉक्टरांनी तिला सक्त आरामाची गरज असल्याचे सांगितले . पण मला याबाबत सारखे खटकत होते .... शिरीष ने ज्या घटना सांगितल्या होत्या ... त्या विचार करण्या सारख्या होत्या .... एकतर तन्वी च्या पुर्वायुष्यात काहीतरी नक्कीच होते की त्यामुळे तन्वी च्या मनावर आणि शरीरां वर याचा परिणाम होतोय .... कारण छिन्नमनस्कता- स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आजार आहे. सर्वसाधारण जनतेमध्ये याचे प्रमाण एक टक्का आहे. दर शंभरांत एक माणूस चक्क "मेंटल' असतो. परिस्तितीत काही वेळा समझुन घेण्याचे मानसिक आधार कोलमडून पडत आहेत. त्यामुळे मने कोसळत आहेत. मानसिक आरोग्यापुढील सर्वांत गंभीर प्रश्‍न आहे तो या बदलत्या मूल्यांचा. रोगासाठी उपचाराच्या अनेक सोयी उभ्या करता येतील; पण वेगळ्याच तत्त्वांना उरी बाळगून झपाट्याने बदलणारी समाजरचना, वेगाने बदलणारी सामाजिक मानसिकता हे सारं भयानक होत चालले .
       शिरीष ला मी बोलवून घेतले आणि तन्वी ला घेऊन मानसोपचारतज्ज्ञ यांचे कडे घेऊन जायला सांगितले . कारण तेच काय योग्य ते कारण शोधू शकतील असे वाटले . शिरीष मानसोपचारतज्ज्ञ यांचे कडे जाऊन आला एक महिन्यानंतर तन्वी मध्ये अमुलाग्र फरक दिसून आला . मानसोपचारतज्ज्ञ तज्ञां नी तन्वी ला संमोहन पद्धतीने तिचा भूतकाळ जाणून घेतल्यानंतर तिच्यावर उपचार केलेत ..
       मानसोपचारतज्ज्ञ यांचेकडे या वेळी मी सुद्धा प्रत्यक्ष तन्वी च्या प्रकृती बद्दल चौकशी करीत होतो आणि अनुभवत होतो की योग्य दिशा योग्य मार्गदर्शन नाही मिळाले तर आयुष्य उध्वस्त होऊ शकते .
       जेव्हा तन्वी च्या दु:खा चे चीडचीड पणाचे कारण समझले तर सर्वस्वी त्याला सामाजिक परिस्तिती चं जबाबदार असल्याचे दिसून आले . तन्वी सातवीत शाळेत असताना त्यांच्याच वाड्यात रहाणाऱ्या यमुना काकू तन्वी ला खूप जीव लावत त्यामुळे तन्वी सारखे यमू काकू कडे असायची ..... यमुना काकू चा नवरा .. रांजणे काका हे ही तन्वी वर खूप माया करीत . पण काही वेळा रांजणे काका यमू काकू घरी नसताना मुद्दाम मांडीवर बसवायचे ... गमंत गोष्टी सांगत आणि गोष्टी सांगता सांगता नको नको तेथे स्पर्श करीत नंतर तन्वी ला हे सारं विचित्र वाटायला लागले आणि घरी आई ,अन्ना ना सांगितले तर खूप वाद होतील म्हणून तन्वी ने यमू काकू कडे जाणेच बंद केले . नंतर कॉलेज ला होस्टेल ला असताना रोहित भेटला जो तिला बहिणी सारखे प्रेम करायचा आणि तू माझी बहिण चं आहे असे करून खूप मदत करायचा . पण त्याने ही एके दिवशी मला माझ्या मित्रा साठी गिफ्ट घ्यायचे म्हणून तन्वी तू चल घेऊन दे ... तुझी चोइस छान आहे . म्हणून घेऊन गेलाय पण गिफ्ट राहिले बाजूला तर त्याने ही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला .
       एकंदरीत पूर्वायुष्या चे कटू सावट  तन्वीच्या मनावर खोल असल्या मुळे तन्वी प्रत्येक माणसात ..व्यक्तीत हे सारे असेच असतील म्हणून ती माझा  शिरीष आपल्या पासून कुणी हिरावून नेऊ नये ह्या भावनेतून तिचा असा चुकीचा वागण्याचा अट्टाहास शिरीष च्या जीवावर उठला होता . पण तसे जर पाहिले तर यामागे एक पुरुषी प्रवृत्ती चं जबाबदार म्हणता येईल .
     
  मानसोपचार तज्ञां नी समुपदेशन करून आणि योग्य तो उपचार करून डॉक्टरानी  तन्वी मध्ये बर्याच प्रमाणावर बदल घडवून आणलाय  हे महत्वाचे .... पण शिरीष सारखा मित्र की ज्याने आपल्या पत्नी ला म्हणजे तन्वी ला समझुन घेतले . कारण आयुष्यात असे अनेक चढ उतार येत असतात पण एकमेकांना सांभाळून घेणेत जी खरी मानसिकता आहे त्यामुळे नात्यात भक्कमपणा आणि विश्वासार्ह्यता येते . किती ही भांडणे होऊ दया , रुसवे फुगवे होऊ दया पण त्यात किती गुंतायचे आणि किती दिवस ते वातावरण दुषित ठेवायचे शेवटी ज्याचे त्याला कळायला हवे ....
       पहा अशीच अस्वथता , वाद विवाद , गैरसमज चालू ठेऊन आयुष्य गढूळ ठेऊन जगायचे की...

समझूतदार मानसिकतेचे  निर्णय कृतीत उतरवून आयुष्य सुंदर बनवायचे ..........

       शेवटी 
मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार 
.
 विचार ..प्रयत्न आणि कृती स्वतः ची ............ आणि आशीर्वाद परमेश्वरा चा ............                                                                                                         राधे __/|\__कृष्ण

श्री स्वामी समर्थ

कैलास मांडगे ......


Monday, September 22, 2014

सकारात्मकतेने सुवर्णमध्य साधने


!! श्री स्वामी समर्थ तव शरणं !!

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् |
करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ||

               एखाद्या मंदिरामध्ये जाणे ... देवाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होवून जाणे, त्याला खाद्य पदार्थांचे चढावे देणे आणि इच्छा मागणे आणि इच्छा पुरती झालीतर त्याला देवाचा प्रसाद मानणे म्हणजे देवाची भक्ती नाही .
प्रसाद या शब्दाचा अर्थ .....''प्रत्यक्ष साक्षात दर्शन '' असा आहे.
हे तेच दर्शन आहे जे स्वामी विवेकानंद यांना झाले होते , हे तेच दर्शन आहेजे भक्त अर्जुनाला झाले होते , हे तेच दर्शन आहे जे संत तुकाराम महाराज ,ज्ञानेश्वर माउली,नामदेव महाराज, मीराबाई ,जनाबाई ,मुक्ताबाई आणि देखीलअशा भरपूर संताना झाले होते आशीर्वाद हा आपल्याला मागून भेटत नाही तर तो स्वताच्या कर्मावर अवलंबून असतो .
भगवान कृष्ण भगवतगीता या मध्ये सहजपणे बोलले आहेत कि ...''आजची हीच माणसेएका बाजूने बोलून दाखवितात कि त्यांना सर्व देणारा मीच आहे म्हणजे परमात्माआहे ,पण काही कालांतरानंतर ,हीच माणसे मीच यांना दिलेले मलाच परत का देतात ''??
माझे मलाच परत देतात . असे का ???
म्हणून देवाकडे काही मागयचेच असेल तर 'जीवन जगण्याची कला मागितली पाहिजे'

जीवन किती जगलो हे महत्वाचे नाही तर जीवन आपण कसे जगलो आणि आता कसे जगत आहे हे महत्वपूर्ण आहे.
स्वप्न प्रत्यक्षात उतरायला बऱ्याच गोष्टींची गरज असते. त्या सर्व गोष्टी आपल्याला हव्या तशा आणि हव्या त्या वेळी हाताशी याव्या लागतात. त्या येतातही; पण बराच वेळा निसटूनही जातात आणि आपलं स्वप्न रंगवायला काही रंग कमी पडतात की काय, याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. मग आपल्याला वाटायला लागतं- ठरवलं तसं घडलं नाही आणि जे घडलं तेआपलं मन मनायला तयार होत नाही. आपण मनात साठवलेलं स्वप्न जसंच्या तसं आपल्याला हवं असतं. थोडेसे रंग नसले म्हणून प्रत्यक्षात आपल्या समोर आकाराला आलेलं स्वप्नही मग आपल्याला भावत नाही. यात स्वप्नांचा दोष नसतो. दोष असतो तो आपल्या मनाचा. रंगांच्या रांगोळीपुढं रंग नसलेली साधी रांगोळीसुद्धा तिचं अस्तित्व दाखवत असते, हे आपण विसरतो.  आपल्या आयुष्यात हे असंच व्हायला पाहिजे होतंअसा विचार करतो पण तसे होत नाही...
हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच की संस्कृती ,तथाकथित, अनैसर्गिकअध्यात्म, तत्वज्ञान हे शब्द आमच्या सारखे तळा गाळातील लोकांना खूप डोक्यावरून जातात . आम्हा मध्यम वर्गीय लोकाना काय ? कसे ? केव्हा ? यापेक्षा आपले अंथरूण जेवढे तेवढेच आम्ही पाय पसरतो . सरळ सरळ आपल्याला झेपेलसे आणि आजूबाजूच्या वातावरण म्हणजे प्रवाहाशी सकारात्मकतेने जुळउन प्रत्येक बाबतीत सुवर्णमध्य साधने एवढेच माहित आहे . कुणी अज्ञानी ,अडाणी किंवा नावे ठेवली तरी तो ज्याची त्याची मानसिकता शेवटी ..
आम्हा खेडूतांना ज्यात आनंद त्यात आम्ही आयुष्य सुंदर करण्याचा प्रयत्न करतो ....

                                राधे __/|\__कृष्ण
                                 !! श्री स्वामी समर्थ !!

Sunday, September 21, 2014

जीवन एक कमाल धमाल आहे


                                  :-:-: जीवन एक कमाल धमाल आहे :-:-:

                                                                                                       श्री. नवनाथ पवार 
                                                                                                                 औरंगाबाद 


जीवन एक कमाल धमाल आहे.. स्थूल रुपात जे जालीम विषच असते ... तेच सूक्ष्म रुपात प्राणशक्तीला सुदृढ बनवणारे गुणकारी औषध असू शकते... कडू धोत्र्यापासून स्ट्रॅमोनियम नावाचे औषध बनते... नागाच्या विषापासून नाजा... सर्पविषापासून लॅकेसीस ... अर्सेनिक पासून अर्सेनिकम ... अशा अनेक रोगविषापासून प्रतिबंधक लसी बनतात ...

मग क्षणभर मनात विचार येतो माझ्या मनातल्या विषापासून असे एखादे औषध बनेल का ? आहे ना वेडगळ कल्पना ? पण मनात आले ते सांगून टाकले.. ! नाही म्हणजे मनातले विषही कमी होईल आणि ते वाया गेले हि बोचही राहणार नाही ...!!
आणि एक ओझरत्या विषदंताचा वण आहे माझ्याही मनावर .... खूप सूक्ष्म मात्रेतल्या त्या विषाने आजवर मला मारले नाही म्हणजे आता त्याचेही असेच प्राणशक्तीला धारण करणारे औषध बनले असावे का रक्तात ? माहित नाही ... खरे म्हणजे मला काही म्हणता काहीच समजत नाही ..... फक्त एखाद्या पहाटे झोप आणि जागेपणाच्या सीमारेषेवर असताना .... आधी जाणवते एका विषदंताची विलक्षण वेदना ... काही क्षण एक धुंद बेहोष ग्लानी ... आणि मग खूप दुरून हळुवारपणे एक नाद ऐकू येऊ लागतो ... सूक्ष्म ... अतिसूक्ष्म ... इतका कि जवळून जाणाऱ्या मुंगीच्या पावलांनीही तो पुसला जातो निमिषभर ... पण त्याची लय वाढत जाते.. सप्तके बदलतात ... अजून काय काय होते माहित नाही ...पण जाणीव नेणिवेच्या सीमारेषेवर पुन्हा एक धुंद बेहोशी ... पण यावेळी ती जागृतीकडे नेणारी ... कोणीतरी आपल्या निळ्याशार नजरेने हळूवार स्पर्श करत मला जागे करत जाते... स्वर जाणवतात पण दिसत नाही... स्पर्श जाणवतो पण ऐकू येत नाही ... रोमरोमातून एक अनाहत नाद ... जणू सरस्वतीची वीणा झंकारत असावी ...

या कुदेंदूतुषार हार धवला ... या शूभ्रवस्त्रावृता
असेच काहीतरी ओझरते झंकारते त्या वीणानादातून ... पण हे काय आता नाद पुन्हा बदलतोय ... वीणानाद की वेणुनाद ... काहीच समजत नाही... ! समजते ते इतकेच की ... आता डोळे उघडताच मला काहीतरी अनुपम सौंदर्य दिसणार आहे... ! हळूच कोणीतरी पापण्यांना उघडायची इच्छा देते ... अन मन म्हणते ... आज तर जिथे जिथे नजर पडेल तिथे सौंदर्य आणि फक्त सौंदर्य दिसेल... !
बस आता टक्क जाग येते ... जवळून आपल्या इवल्याशा जबड्यात एक अन्नकण घेऊन जाणारी मुंगी दिसते... मला राहवत नाही...ह्यालो मुंगीताई .. कशी काय बरी आहेस ना ? नाही म्हणजे सांगायला हरकत नाही पण तू आज खूपच सुंदर दिसतेस ... बाहेर अंगणात एक चीऊ मातीत पंखांची थरथर मिसळून धूळस्नान करत असते... मी तिलाही आय लव्ह यु म्हणून कौतुक करतो ... विजेच्या तारेवर आपल्याच पंखात चोच खुपसून खुपसून सफाई करणाऱ्या कावळ्याला पण .. गुड मॉर्निंग म्हणून मी विश करतो .. अन माझ्याकडे संशयाने पहात तो आभाळात झेपावतो ... आपल्याच मस्तीत शिस्तीत उडणारी बगळ्यांची माळही आज माझ्या विशच्या टप्प्यात असते... पहाटेचा संधिप्रकाश उजळताना मी आता ठार वेड्या सारखा हसत गुणगुणत असतो ... कुठेही बोटाने काहीतरी अगम्य लिपीत काहीतरी गिरवत जातो ... भिंतीवर ... हवेत ... आरशाच्या धुळीवर ... कागदाच्या चिठोर्यावर .... मी अदृश्य घाटदार वेलांट्या गिरवत जातो..
हळूहळू उन्हं तापू लागतात ... मनातल्या विश पुन्हा विषारी होऊ लागतात ... संध्याकाळी सगळे अंगांग विषारी धुळीने माखलेले .... चहा घेता का विचारणाऱ्या आवाजावर आता मी केवढ्याने तरी खेकसतो .....
माहित नाही तुला ...? मला चहा शब्दाचीसुद्धा किती घृणा आहे ! का विचारतेस रोज दोन वेळा दावेदारणी सारखी ? ....
मग काही खातोस ... ?
काय खाऊ घालशील ?... जहर ?
तिच्यावर माझ्या कुठल्याच विखारी शब्दाचा असर होत नाही... आणि हाच माझा मोठा अपमान असतो ... माझे जहर इतके निष्प्रभ कसे झाले दिवसभरात ? का दिसत नाही काहीच असर ... म्हणजे मी दिवसभरात ओकत गेलो तेही असेच वाया गेले असेल... ?
माझा विषारी अहंकार दुखावतो पण काही हालचाल करता येईल अशा अवस्थेत नसतोच उरलेला ..... त्याला पहायचे असते सारे जग पेटलेले ... अन सकाळची मुंगी पुन्हा दिसते तितक्याच लगबगीने जाताना ... पण मला धुमसताना पाहून थबकते क्षणभर ... हाय पिल्ला गुड इवनिंग ... आता मात्र माझ्या संतापाचा बांध फुटतो ... साली ...साध्या खसखशीच्या दाण्याइतकीही जाड नाही... अन म्हणे मी पिल्लू ...! मी उपहासाने हसून तिला बाय करतो... तर अंगणातली चिमणी पण चिव चिव करत म्हणते कशी ...

..... हाय रे ..! काय सॉलिड दिसतोयस आज ...! एकदम स्मार्ट ...!! मी हातात येईल ते तिला फेकून मारतो ... आणि ती माझा नेम चुकवून भुर्रकन उडून तारेवर जाऊन बसते... अन पुन्हा तो कावळा माझ्याकडे एकाक्ष नजरेने पहात, तिच्याकडे दुसरा डोळा मिचकावून मला म्हणतो .... हाय दादा .. इतका काळा ठिक्कर कसा पडलास ? माझा पिअर्स साबण देऊ का पाठवून ?
आता मी इतका भडकतो कि सांगता सोय नाही...अभद्र ... काळचोच्या .. साल्या ...! हजारो वर्षात इतकाही सुसंस्कृतपणा आला नाही तुम्हा कावळ्याच्या जातीत ...! पुन्हा दिसेल ते हाती घेऊन त्याच्यावर भिरकावतो ... तो नेम चुकवत इकडून तिकडे उडत राहतो ... मीच मग घामाघूम होऊन चडफडत खाली बसतो ... कोणाला काहीच फरक पडत नाहीय माझ्या चिडण्याने !
....आता त्राणच उरलेले नसते माझ्या विषात ... पण मी चिडत नाही... आता मनात फक्त मंद हसू फुटू लागते... पुन्हा एक काळोख चहूबाजूंनी मला आपल्या बाहूत कवटाळतो ... कोण म्हणते काळोख अशुभ असतो ? ....पापण्या मिटतात ... हळूच एक बेहोशी रोमरोमातून उगवते ... एक सूक्ष्म कंपन हवेच्या अनुरेणुतून झंकारत जाऊ लागते... पुन्हा मी जागृती आणि झोपेचा झुल्यावर ... वेणुनाद कि वीणानाद ...... अन एक अदृश्य चुंबन कपाळावर ... पापण्यावर ... ओठावर ... खोल जाणीवेतून .. नेणीवेत जाताजाता ... विषदंताची खुण आता .. जाणवत नाही... काय होणार असते माझे ... कुणास ठाऊक ?  ...न...
https://www.facebook.com/
 
                                                         श्री. नवनाथ पवार 
·   (     All religions ultimatly shall for human beings, in present world.
 Anything committing after death, isabsolutely ignored by me.
 I only believe in nature and its rules. Any contradiction with religion, 
I will adhere to nature and humanity than god.)


                                                                                                                 राधे __/|\__कृष्ण 

Thursday, September 18, 2014

रेसिपी अशी सुद्धा


:-:-: रेसिपी अशी :-:-:

                                                          संग्रहक -दिपाली कारुळकर कुलकर्णी 
 


                 गणेशोत्सवात गणेशाची स्थापना झाल्यानंतर बहुसंख्य लोकांकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या ऋषीपंचमी या दिवसाचेही मोठे महत्व आहे. गौरी गणपतीची आरास,  त्यांची मिरवणूक,गणपतीसाठी केले जाणारे गोडधोडाचे पदार्थ यांना जसे अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच ऋषीपंचमीच्या दिवशी घराघरात केल्या जाणाऱ्या ऋषीच्या भाजीचेही. हा दिवस साजरा करण्यामागे किंवा हि भाजी तयार करण्यामागे वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. वेगवेगळ्या गुणांनी युक्त अश्या भाज्यांचा आस्वाद घेता यावा,त्यातून चव आणि पौष्टिक आहार अश्या दोन्ही गोष्टी साधता याव्यात हादेखील हेतू असतो.एकप्रकारे संतुलित आहाराचे महत्व पटवून देणारा हा दिवस असतो असे म्हटले तर वावगे ठरू नये.
पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार बैलाच्या श्रमातून तयार झालेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन या दिवशी करू नये असे संकेत आहेत.वर्षभर बैलांकडून माणूस श्रम करून घेत असतो,या दिवसाच्या निमित्ताने आपल्या परसात पिकवलेल्या भाज्यांचा समावेश करून हि भाजी तयार करणे हा यामागचा खरा उद्देश. अर्थात शहरात हे शक़्य नाही म्हणून भाज्या विकत आणून त्यापासून ऋषीची भाजी तयार करतात.
                      



रांधायची अशी...:
भाज्या: लाल भोपळा,पावसाळी काकडी,दोडके,भेंडी, कंदमुळे किंवा सुरण,रताळी,लाल माठाचे देठ,अळू, मक्याची कणसे,ओल्या वाटण्याचे दाणे,भुईमुगाचे दाणे,चवळीच्या कोवळ्या शेंगा,पडवळ,हिरव्या मिरच्या.
सोबत खोवलेला नारळ,मिरपूड,मीठ,कोळलेली चिंच यांचाही समावेश करावा.

कृती: भोपळा,काकडी,दोडके,दुधी, अश्या लवकर शिजू शकणाऱ्या भाज्यांचे मोठे काप व शिजायला वेळ लागणाऱ्या भाज्यांचे लहान कांप करा. पानांचे बारीक तुकडे तर माठ तसेच अळूच्या देठांचे लांब तुकडे पाडा. भेंडी वगळता इतर भाज्या मोठ्या पातेल्यामध्ये घालून त्या बुडतील एवढे उकळते पाणी ठेवा व कमी आचेवर शिजायला ठेवा. सुरण,रताळे किंवा कंदाच्या फोडी मऊ झाल्यावर त्यात मीठ,मिरपूड,नारळ,चिंचेचा कोळ टाका व नंतर भेंडीही चिरून घाला. थोडावेळ उकळल्यानंतर भाजी तयार होईल. हि वऱ्याच्या तांदळा बरोबर व दही यासोबत खाता येईल....
संग्रहक -दिपाली कारुळकर कुलकर्णी 

राधे __/|\__कृष्ण

!! श्री स्वामी समर्थ !!

Tuesday, September 16, 2014

ठेविले अनंते तैसेची राहावे


:@:  ठेविले अनंते तैसेची राहावे  :@:

मनोगत --  मंदाकिनी रासकर


ठेविले अनंते तैसेची राहावे .
 खरंच हि वाटते एकच ओळ , पण यात किती मोठा भाव दडला आहे ना ?
 काही लोकं रंगाला , रुपाला किती नको तेवढे महत्व देतात .
 पण त्या व्यक्ती मध्ये काही गुण आहेत कि नाहीत हे कुणी पाहते कां कधी ?
 आपल्याला जन्म घेताना जर आपल्या मनाप्रमाणे जर रंग आणि रूप निवडता आले असते तर ? तर साहजिकच प्रत्येकाने सुंदरच रूप निवडले असते .पण असे नाही घडत . जे आपल्या नशिबात असेल आणि जितके असेल तितकेच आपल्याला मिळते .

मी लहान असतांना मला अजूनही आठवते माझ्या घरात मीच फक्त काळी , जाड , आणि नाकाने नकटी होते . माझ्या माहेरी सगळे दिसायला सुंदर आणि गोरेपान त्यात मीच फक्त अशी वेगळी होते . आम्ही कुठेही कार्यक्रमाला एखाद्या गेलो कि लगेच सगळे विचारायचे हि तुमचीच मुलगी कां ? किंवा माझ्या बहिणीना म्हणायचे हि तुमची सख्खी बहीण कां ? मग हो असे उत्तर आले , कि लगेच बायका म्हणायच्या वाटत नाही पण !! हि खुपच वेगळी आहे दिसायला !! मला हा भेदभाव पाहून माझ्या बालमनाला राग येणे साहजिकच होते . हळूहळू मला असं वाटायचं कि कुठे जायलाच नको आपण . म्हणजे कुणी काही विचारणारच नाही असं . मला तेंव्हा ती जुन्या गीताची एक ओळ आठवायची ,
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ,
 होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक .
 पण मी मग हा विचार करणे कालांतराने हळूहळू सोडून दिले . मनांत विचार केला कि , काहीही झालं तरी आता आपल्यात बदल तर होणार नाहीच ना ? आपण जसे आहोत तसेच दिसणार ना ? मग कां रडत आणि कुढत बसायचे उगीच ? जग आणि लोकं गेली उडत तिकडच !!
 आपल्याला आयुष्य जगायचंय आपलं आणि तेही हसत हसत आनंदाने भरभरून अगदी !!
मग कां विचार करायचा कुणाचा ? मला आताही जर एखाद्या व्यक्तीला रंगारूपा साठी कुणी काही बोलले कि खुप राग येतो आणि वाईटही वाटते . त्या व्यक्तीत मला मी दिसते . आणि मी विचार करते कि , काय असुरी समाधान  मिळत असेल बरं लोकांना इतरांना हिणवण्यात किंवा कमी लेखण्यात ? अरे तुम्ही आधी तुमचे रूप पहाना मग इतरांना पहा !! मी नेहमी असा विचार करते कि , निदान आपल्याला नशिबाने सर्व सदृढ शरीर तरी मिळाले आहे . पण काहींच्या नशिबात तर तेही नसते . काहींना हात नाही तर काहींना पाय नाही . काहींना दृष्टी नाही तर काहींना बोलता किंवा ऐकता येत नाही . काहींचे दुर्दैव असे की ते जन्माला येतानाच अपंगत्व घेऊन येतात . त्यांनी तर काय अपराध केला होता की त्यांना आयुष्यभर अपंगत्व झेलावे लागून जीवनात आनंदी रहायचे .

आपण नेहमी अशा व्यक्तींना पाहून ईश्वराचे आभार मानावेत कि मला तू परिपूर्ण बनवलेस . आणि या ऋणातून जर मुक्त व्हावे असे वाटत असेल तर सर्वांनी मरणोत्तर देहदान देखील अवश्य करावे . असेही मृत्यू नंतर आपले शरीर नष्टच होणार असते . ते जर सत्कारणी लागले तर त्यासारखे दुसरे पुण्य नाही .
 काय वाटते नक्कीच आपण सर्वांनी याचा जरूर एकदा तरी विचार केला तर एक वेगळी अनुभूती जाववेल की 
आयुष्य किती सुंदर आणि मोहक आहे
. धन्यवाद .

 मंदाकिनी रासकर .    

राधे __/|\__कृष्ण

!! श्री स्वामी समर्थ !!

Wednesday, September 10, 2014

पितृपंधरवडा --- स्मित पाठारे

---:     पितृ पंधरवडा :---

                                         लेखिका – स्मित पाठारे


 आज पासून पितृ पंधरवडा सुरु आहे . हिंदू धर्माचे हे एक खास वैशिष्ट्य आहे जिवंत असताना वाढदिवस साजरे करतात . आणि स्वर्गवासी पितरांचे या दिवसात आठवणीने त्यांच्या तिथीला श्राद्ध करतात. आपल्या कुटुंबातील जेष्ठ व्यक्ती मृत झाल्या कि त्यांचे स्मरणार्थ अनेक गोष्टी केल्या जातात . ऐच्छिक विषय आहे ह. पण काहीच करणे शक्य नसते तेंव्हा मात्र त्यांचे तिथीला मृत्यु झाला असेल त्या दिवशी असणाऱ्या तिथीला दान करणे, श्राद्ध , तर्पण करणे . या सगळ्या गोष्टी येतात . काहीच शक्य नसेल त्यांनी आपल्या पितरांचे स्मरण जरूर करावे . सगळ्याच गोष्टी करण्यावर अनेकांचा विश्वास नसतो . अशावेळी ज्यांच्यामुळे आहोत आपण त्यांचे स्मरण तरी करावे . गेलेल्या व्यक्तीच्या आवडीचे भोजन आणि खास पितृपक्षात केली जाणारी पंचभेली भाजी आणि इतर आपल्या माहिती प्रमाणे गवार , भोपळा, कारले , माठाचे देठ , यांचे महत्त्व असते . मांसाहारी लोक मांसाहार मद्य घेणारे असतील तर ते , शाकाहारी त्यांच्या त्यांच्या सवई आणि आवडी प्रमाणे भोजन करतात. जेवणात आपण काय ठेवतोय यापेक्षा किती प्रेमाने आणि आदराने करतोय याला अधिक महत्त्व असते


. पण माझ्या मते हे सगळे मृत्यू पश्चात करायचे झाले . पण हयात असतानाच त्यांचा आदर राखला , प्रेमाने वागले

त्यांची काळजी घेतली तर किती योग्य नाही का ? कारण तो आतां वयाने थकलेला असतो , अनुभवांच्या चटक्यानी पोळलेला असतो. वृध्वत आल्याने स्मृती जागृत नसते , शारीरिक शक्ती क्षीण झालेली असते , दृष्टी मंदावलेली असते . या सर्व परीस्तीतीत खरी गरज असते त्यांना उत्तम साथी ची , खांदा हवा असतो क्षणभर मन मोकळे करण्यासाठी , मनातले विचार सांगायला कोणीतरी बोलायला हवे असते ,सोबत क्षण दोन क्षण आपल्या सोबत बसणारे कोणी तरी हवे असते . नजरेला दिसत नाही जवळची वस्तू चाचपडून मिळत नाही / लक्षात येत नाही ती देणारे कोणी तरी हवे असते . आणि हे सारे करण्यासाठी वेळ नसतो आपल्या कडे त्यांच्या अपेक्षांना एक पैसाही खर्च होणार नसतो ज्यांनी आपल्याला घडवताना मोठ करताना आयुष्य खर्च केलेलं असत . त्यांना फक्त चार शब्द प्रेमाचे हवे असतात . काहीना वृधाश्रमाची वाट दाखवावी लागते त्याला काही कारणे असतील. काहीना वेगळे राहावे लागते आई वडिलापासून यालाही अनेक करणे असतील ," टाळी एका 

हाताने वाजत नाही " हे माहित आहे मला म्हणून कारणे कोणतीही असोत आई वडिलांचे म्हातारपण फार जपा . आपणही 

एक दिवस यातून जाणार आहोत याचे भान ठेवा . 


अगदी वेगळे राहत असाल तर त्यांची काळजी घ्या हवे नको ते बघा एक तरी भेट/ फोन त्यांना आवर्जून करा . वृद्धाश्रमात आई बाबा असतील तर त्यांना महिन्यातून एकदा तरी भेट द्या , फोनवर बोलत राहा . एवढा वेळ कुठे आमच्या कडे असे नका म्हणू ते निघून गेले कि पुन्हा वेळ कधीच मिळणार नाही . आणि मग असे पितृपक्षात पानाला कावळा कधी शिवतोय याची वाट पाहत बसावे लागणार नाही . म्हणतात अतृप्त आत्मे त्रास देतात आपल्या अवतीभोवती कितीतरी माणसे अशी असतात कि त्यांच्या इच्छा पूर्ण नसतात झालेल्या समोरच्याची प्रगती बघून किती तरी असे आत्मे अतृप्त असतात आणि ते जिवंत पणी अशा चांगल्या लोकांशी कसे वागतात बघा या अतृप्त लोकांचे अनुभव जवळ बाळगून आपल्या घरातील कोणताही आतां अतृप्त राहणार नाही याची काळजी घ्या . म्हणजे कधी अतृप्त आत्मे तुमच्या सुखा मध्ये ढवळाढवळ करणार नाहीत असे मला नक्की वाटते . आणि आपल्या पुढच्या सगळ्याच पिढ्या सुखी समाधानी राहतील ……………

स्मित........
!!श्री स्वामी समर्थ !!
राधे __/|\__कृष्ण