---: पितृ पंधरवडा :---
लेखिका
– स्मित पाठारे
आज पासून पितृ पंधरवडा सुरु आहे . हिंदू धर्माचे हे
एक खास वैशिष्ट्य आहे जिवंत असताना वाढदिवस साजरे करतात . आणि स्वर्गवासी पितरांचे
या दिवसात आठवणीने त्यांच्या तिथीला श्राद्ध करतात. आपल्या कुटुंबातील जेष्ठ
व्यक्ती मृत झाल्या कि त्यांचे स्मरणार्थ अनेक गोष्टी केल्या जातात . ऐच्छिक विषय
आहे ह. पण काहीच करणे शक्य नसते तेंव्हा मात्र त्यांचे तिथीला मृत्यु झाला असेल
त्या दिवशी असणाऱ्या तिथीला दान करणे, श्राद्ध
, तर्पण करणे . या सगळ्या गोष्टी येतात . काहीच शक्य
नसेल त्यांनी आपल्या पितरांचे स्मरण जरूर करावे . सगळ्याच गोष्टी करण्यावर
अनेकांचा विश्वास नसतो . अशावेळी ज्यांच्यामुळे आहोत आपण त्यांचे स्मरण तरी करावे
. गेलेल्या
व्यक्तीच्या आवडीचे भोजन आणि खास पितृपक्षात केली जाणारी पंचभेली भाजी आणि इतर
आपल्या माहिती प्रमाणे गवार , भोपळा, कारले , माठाचे
देठ , यांचे महत्त्व असते . मांसाहारी लोक मांसाहार मद्य
घेणारे असतील तर ते , शाकाहारी
त्यांच्या त्यांच्या सवई आणि आवडी प्रमाणे भोजन करतात. जेवणात आपण काय ठेवतोय
यापेक्षा किती प्रेमाने आणि आदराने करतोय याला अधिक महत्त्व असते
. पण
माझ्या मते हे सगळे मृत्यू पश्चात करायचे झाले . पण हयात असतानाच त्यांचा आदर
राखला , प्रेमाने वागले ,
त्यांची काळजी घेतली तर किती योग्य नाही का ? कारण तो आतां वयाने थकलेला असतो , अनुभवांच्या चटक्यानी पोळलेला असतो. वृध्वत आल्याने स्मृती जागृत नसते , शारीरिक शक्ती क्षीण झालेली असते , दृष्टी मंदावलेली असते . या सर्व परीस्तीतीत खरी गरज असते त्यांना उत्तम साथी ची , खांदा हवा असतो क्षणभर मन मोकळे करण्यासाठी , मनातले विचार सांगायला कोणीतरी बोलायला हवे असते ,सोबत क्षण दोन क्षण आपल्या सोबत बसणारे कोणी तरी हवे असते . नजरेला दिसत नाही जवळची वस्तू चाचपडून मिळत नाही / लक्षात येत नाही ती देणारे कोणी तरी हवे असते . आणि हे सारे करण्यासाठी वेळ नसतो आपल्या कडे त्यांच्या अपेक्षांना एक पैसाही खर्च होणार नसतो ज्यांनी आपल्याला घडवताना मोठ करताना आयुष्य खर्च केलेलं असत . त्यांना फक्त चार शब्द प्रेमाचे हवे असतात . काहीना वृधाश्रमाची वाट दाखवावी लागते त्याला काही कारणे असतील. काहीना वेगळे राहावे लागते आई वडिलापासून यालाही अनेक करणे असतील ," टाळी एका
हाताने वाजत नाही " हे माहित आहे मला म्हणून कारणे कोणतीही असोत आई वडिलांचे म्हातारपण फार जपा . आपणही
एक दिवस यातून जाणार आहोत याचे भान ठेवा .

अगदी वेगळे राहत असाल तर त्यांची
काळजी घ्या हवे नको ते बघा एक तरी भेट/ फोन त्यांना आवर्जून करा . वृद्धाश्रमात आई
बाबा असतील तर त्यांना महिन्यातून एकदा तरी भेट द्या , फोनवर बोलत
राहा . एवढा वेळ कुठे आमच्या कडे असे नका म्हणू ते निघून गेले कि पुन्हा वेळ कधीच
मिळणार नाही . आणि मग असे पितृपक्षात पानाला कावळा कधी शिवतोय याची वाट पाहत बसावे
लागणार नाही . म्हणतात अतृप्त आत्मे त्रास देतात आपल्या अवतीभोवती कितीतरी
माणसे अशी असतात कि त्यांच्या इच्छा पूर्ण नसतात झालेल्या समोरच्याची प्रगती बघून
किती तरी असे आत्मे अतृप्त असतात आणि ते जिवंत पणी अशा चांगल्या लोकांशी कसे
वागतात बघा या अतृप्त लोकांचे अनुभव जवळ बाळगून आपल्या घरातील कोणताही आतां अतृप्त
राहणार नाही याची काळजी घ्या . म्हणजे कधी अतृप्त आत्मे तुमच्या सुखा मध्ये
ढवळाढवळ करणार नाहीत असे मला नक्की वाटते . आणि आपल्या पुढच्या सगळ्याच पिढ्या
सुखी समाधानी राहतील ……………।
स्मित........
!!श्री स्वामी समर्थ !!
राधे __/|\__कृष्ण
No comments:
Post a Comment