****-वृद्धत्व शाप कि वरदान ==>> " पराधीन आहे
पुत्र जगती मानवाचा "-**
कैलास मांडगे ....
जगावं कि मरावं ~~~हा एकच सवाल आहे .~~ या दुनियेच्या उकिरड्यावर ..खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन ~~~ जगावं बेशरम लाचार आनंदानं , कि गुंडाळ्या जाणीवेच्या यातनेसह मृतुच्या
काळ्याशार डोहामध्ये ? आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारान ..माझा
..तुझा ..याचा आणि त्याचाहि.==>>विधात्या , तू इतका कठोर का झालास ..एका बाजूला ,आम्ही ज्याना जन्म
दिला ते आम्हाला विसरतात .. आणि दुसर्या बाजूला , ज्यान आम्हाला जन्म दिला ..तो तुही आम्हाला विसरतोस ,मग विस्कत्लेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणाकरा आम्ही थेरड्यानि कोणाच्या
पायांवर डोकं आदळायच ! कोणाच्या ~~ पायावर ~~~ कोणाच्या ~~~
हे घनघनत कानात लाव्हारस ओतावा असे जाणवणारे
करुण शब्द आहेत मराठी रंगभूमीचा सार्वभौम राजा नटसम्राट गणपतराव बेलवलकर , गणपतराव जोश्यांचा पट्टशिष्य ,खाडिलकर -गड्कार्यानसारख्या दैव्तांसारख्या
दैवतांनी ज्यांच्या पाठीवर हाथ ठेवला असा कलावंत ,लक्षावधी रसिकांच्या आशीर्वादामुळे कुबेराहून श्रीमंत आणि इंद्रापेक्षा
भाग्यवान झालेला रंगदेवतेचा पुजारी ...आप्पासाहेब बेलवलकर ...
"सुनांना सासू-सासऱ्यांत
आई-वडील दिसावेत व सासू-सासऱ्यांनीही सुनांमध्ये आपल्या लेकीला पाहावे. ही नाती का
जपली जात नाहीत. मुलगा आवडतो तर सून का आवडू नये? नवरा आपला वाटतो तशी सासू का
वाटू नये? हेच प्रश्न आज समाजाला
भेडसावत आहेत. त्याला कारण सध्याचे आधुनिक जीवनमान, त्यानुसार येणारी विचारसरणी व
पैशाला प्राप्त झालेले महत्त्व आहे. यामध्येही फक्त संस्कारित मनच नाती जपू शकते.'' लहानपणी आईच्या शेजारी झोपण्यासाठी भांडणारी मुले मोठेपणी मात्र आईला कोणी
सांभाळावयाचे यासाठी भांडतात.
आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठविण्याचा या युगात नाती संपत
चालली आहेत,
त्यामुळेच संस्काराला महत्त्व आहे.
तीन वर्षापूर्वी
पुण्यात एका गंभीर आणि महत्वाच्या समस्येवर बैठक बोलवनेत आली होती. जेष्ट्य
नागरिक प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर उप्स्तीत होते. कारण बहुतेक चांगल्या सुशिक्षित, सुसंस्कृत घरात
सुद्धा घरातील जेष्ट्य वृध्द असलेल्या आई
- वडील यांच्यावर भावनिक अत्याचाराचे प्रमाण वाढले होते . मी सुद्धा त्या बैठकीला
उपसस्तीत होतो. त्यावेळी
रोहिणी पटर्वर्धन यांचा लेख ,श्रीमती कानडे
यांचे विचार , व सोलापूर येथे
झालेले सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा
रामतीर्थकर यांचे "चला नाती जपूया' लेखन मला वाचावयास मिळाले. अशा या समाजातील घराघरातील
जेश्तांच्या समस्या संपलेल्या नाहीत त्या सुरूच
आहेत आणि आजही काही काही ठिकाणी गेलेनंतर मेंदू आणि मन सुन्न होतंय .
लग्नानंतर चार महिन्यांतच नाती समजत नसतात, त्यासाठी कुटुंबात रुजावे, रमावे लागते. आजच्या जमान्यात
आईपणच संपत चालले आहे. काही मुलींना उंबऱ्याच्या मर्यादाच
राहिलेल्या नाहीत. त्यासाठी आईचे प्रेम खूप छान आहे, सुंदर आहे याची जाणीव ठेवा. त्यातून सगळी
नाती जोडा व स्त्रीत्वाची जाणीव ठेवा. मात्र त्यासाठी
अन्याय सहन करू नका, पण कोणावरही अन्याय करू नका. "प्रत्येकालाच आपण म्हातारे झाल्याचे कळते. त्यातल्या त्यात पुरुषाला लवकर कळते, पण आपली पत्नी म्हातारी झाल्याचे का कळत नाही? आईची जाणीव व जपणूक सर्वांनीच केली तर वृद्धाश्रमाची गरज काय.?'' मुलींनी शिक्षण घ्यावे. जगाच्या स्पर्धेत
जरूर उतरावे, मात्र आपण भारतीय आई आहोत याचे भान ठेवण्यासाठी जमिनीवरच राहावे तरच नाती जपली
जातील , नाहीतर कधीही नाही.
"वृद्धत्व शाप
केव्हा ठरतं."=>"वृद्ध व्यक्तिचे
सर्व साधारण दोन भाग पाडले जातात.जे वृद्ध ६० ते
७० वयोगटात असतात,त्याना तरुण वृद्ध म्हणतात,आणि जे सत्तर पेक्षा अधीक वयाचे असतात
त्याना जास्त वृद्ध असं म्हणतात.ही वृद्ध मंडळी
सर्वसाधारणपणे क्रियाशील नसतात. त्यांचं जास्त प्रमाणात वास्तव्य कुटुंबातच असतं. ..बरसूनही आकाश सारे आभाळणारे म्हातारे न रचलेल्या सरणावरती रोज जळणारे म्हातारे
रस्ता चालून अस्थिपंजर झाली काया ,थकले पाय तरी अस्ताचलाच्या
वाटेवरती घुटमळणारे म्हातारे विरली स्वप्ने.
आजच्या जगात मामाचे नाते तर दुर्मिळच होत चालले आहे. कर्तृत्ववान मुले असतील अथवा नालायक मुले असतील तरी दोघांसाठी काहीही अगदी एक रुपयाही ठेवू नये. कारण कर्तृत्ववान मुले कमावतील तर नालायक मुले गमावतील. आणि सर्व महिला आणि पुरुष स्नेहीनो आज आपण तरुण आहोत .. भविष्यात आपणही वृद्धः होणार आहोत .. हे निसर्ग चक्र आहे .. हे कोणीही बदलू शकत नाही त्यामुळे विचार करा आपल्या घरातील ज्येष्टा ना कसे ठेवायचे हे आपणच ठरवायचे आहे ? निर्णय आता मला ,तुम्हाला .... सर्वाना घ्यायचाय .......
!! श्री स्वामी समर्थ !!
राधे __/|\__ कृष्ण
No comments:
Post a Comment