:-:-: रेसिपी अशी :-:-:
गणेशोत्सवात
गणेशाची स्थापना झाल्यानंतर बहुसंख्य लोकांकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या ऋषीपंचमी
या दिवसाचेही मोठे महत्व आहे. गौरी गणपतीची आरास, त्यांची मिरवणूक,गणपतीसाठी केले जाणारे
गोडधोडाचे पदार्थ यांना जसे अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच ऋषीपंचमीच्या दिवशी
घराघरात केल्या जाणाऱ्या ऋषीच्या भाजीचेही. हा दिवस साजरा करण्यामागे किंवा हि
भाजी तयार करण्यामागे वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. वेगवेगळ्या गुणांनी युक्त
अश्या भाज्यांचा आस्वाद घेता यावा,त्यातून चव आणि पौष्टिक आहार अश्या दोन्ही गोष्टी साधता याव्यात हादेखील हेतू असतो.एकप्रकारे संतुलित
आहाराचे महत्व पटवून देणारा हा दिवस असतो असे म्हटले तर वावगे ठरू नये.
पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार बैलाच्या श्रमातून
तयार झालेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन या दिवशी करू नये असे संकेत आहेत.वर्षभर
बैलांकडून माणूस श्रम करून घेत असतो,या
दिवसाच्या निमित्ताने आपल्या परसात पिकवलेल्या भाज्यांचा समावेश करून हि भाजी तयार
करणे हा यामागचा खरा उद्देश. अर्थात शहरात हे शक़्य नाही म्हणून भाज्या विकत आणून
त्यापासून ऋषीची भाजी तयार करतात.
रांधायची
अशी...:
भाज्या: लाल भोपळा,पावसाळी काकडी,दोडके,भेंडी, कंदमुळे किंवा सुरण,रताळी,लाल माठाचे देठ,अळू, मक्याची कणसे,ओल्या वाटण्याचे दाणे,भुईमुगाचे दाणे,चवळीच्या कोवळ्या शेंगा,पडवळ,हिरव्या मिरच्या.
सोबत खोवलेला नारळ,मिरपूड,मीठ,कोळलेली चिंच यांचाही समावेश करावा.
भाज्या: लाल भोपळा,पावसाळी काकडी,दोडके,भेंडी, कंदमुळे किंवा सुरण,रताळी,लाल माठाचे देठ,अळू, मक्याची कणसे,ओल्या वाटण्याचे दाणे,भुईमुगाचे दाणे,चवळीच्या कोवळ्या शेंगा,पडवळ,हिरव्या मिरच्या.
सोबत खोवलेला नारळ,मिरपूड,मीठ,कोळलेली चिंच यांचाही समावेश करावा.
कृती:
भोपळा,काकडी,दोडके,दुधी, अश्या लवकर शिजू
शकणाऱ्या भाज्यांचे मोठे काप व शिजायला वेळ लागणाऱ्या भाज्यांचे लहान कांप करा.
पानांचे बारीक तुकडे तर माठ तसेच अळूच्या देठांचे लांब तुकडे पाडा. भेंडी वगळता
इतर भाज्या मोठ्या पातेल्यामध्ये घालून त्या बुडतील एवढे उकळते पाणी ठेवा व कमी
आचेवर शिजायला ठेवा. सुरण,रताळे
किंवा कंदाच्या फोडी मऊ झाल्यावर त्यात मीठ,मिरपूड,नारळ,चिंचेचा कोळ टाका व
नंतर भेंडीही चिरून घाला. थोडावेळ उकळल्यानंतर भाजी तयार होईल. हि वऱ्याच्या
तांदळा बरोबर व दही यासोबत खाता येईल....
संग्रहक -दिपाली कारुळकर कुलकर्णी
संग्रहक -दिपाली कारुळकर कुलकर्णी
राधे
__/|\__कृष्ण
!!
श्री स्वामी समर्थ !!
No comments:
Post a Comment