!! श्री स्वामी समर्थ तव शरणं !!
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना
वा प्रकृतेः स्वभावात् |
करोमि
यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ||
एखाद्या मंदिरामध्ये जाणे ... देवाच्या
मूर्तीसमोर नतमस्तक होवून जाणे, त्याला खाद्य पदार्थांचे चढावे देणे आणि इच्छा मागणे आणि इच्छा पुरती
झालीतर त्याला देवाचा प्रसाद मानणे म्हणजे देवाची भक्ती नाही .
हे तेच दर्शन आहे
जे स्वामी विवेकानंद यांना झाले होते , हे तेच दर्शन आहेजे भक्त अर्जुनाला झाले होते , हे तेच दर्शन आहे जे संत तुकाराम महाराज ,ज्ञानेश्वर माउली,नामदेव महाराज, मीराबाई ,जनाबाई ,मुक्ताबाई आणि देखीलअशा भरपूर संताना झाले होते आशीर्वाद हा
आपल्याला मागून भेटत नाही तर तो स्वताच्या कर्मावर अवलंबून असतो .
भगवान कृष्ण
भगवतगीता या मध्ये सहजपणे बोलले आहेत कि ...''आजची हीच माणसेएका बाजूने बोलून दाखवितात कि त्यांना सर्व
देणारा मीच आहे म्हणजे परमात्माआहे ,पण काही कालांतरानंतर ,हीच माणसे मीच यांना दिलेले मलाच परत का देतात ''??
माझे मलाच परत
देतात . असे का ???
म्हणून देवाकडे
काही मागयचेच असेल तर 'जीवन जगण्याची कला मागितली पाहिजे'
जीवन किती जगलो
हे महत्वाचे नाही तर जीवन आपण कसे जगलो आणि आता कसे जगत आहे हे महत्वपूर्ण आहे.
स्वप्न प्रत्यक्षात उतरायला बऱ्याच गोष्टींची गरज असते. त्या सर्व गोष्टी आपल्याला हव्या तशा आणि हव्या त्या वेळी हाताशी याव्या लागतात. त्या येतातही; पण बराच वेळा निसटूनही जातात आणि आपलं स्वप्न रंगवायला काही रंग कमी पडतात की काय, याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. मग आपल्याला वाटायला लागतं- ठरवलं तसं घडलं नाही आणि जे घडलं तेआपलं मन मनायला तयार होत नाही. आपण मनात साठवलेलं स्वप्न जसंच्या तसं आपल्याला हवं असतं. थोडेसे रंग नसले म्हणून प्रत्यक्षात आपल्या समोर आकाराला आलेलं स्वप्नही मग आपल्याला भावत नाही. यात स्वप्नांचा दोष नसतो. दोष असतो तो आपल्या मनाचा. रंगांच्या रांगोळीपुढं रंग नसलेली साधी रांगोळीसुद्धा तिचं अस्तित्व दाखवत असते, हे आपण विसरतो. आपल्या आयुष्यात हे असंच व्हायला पाहिजे होतंअसा विचार करतो पण तसे होत नाही...

हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच की संस्कृती ,तथाकथित, अनैसर्गिक,
अध्यात्म, तत्वज्ञान हे शब्द आमच्या सारखे तळा गाळातील
लोकांना खूप डोक्यावरून जातात . आम्हा मध्यम वर्गीय लोकाना काय ? कसे ? केव्हा ? यापेक्षा आपले अंथरूण जेवढे तेवढेच आम्ही पाय पसरतो . सरळ सरळ आपल्याला झेपेलसे
आणि आजूबाजूच्या वातावरण म्हणजे प्रवाहाशी सकारात्मकतेने जुळउन
प्रत्येक बाबतीत सुवर्णमध्य साधने एवढेच माहित आहे . कुणी अज्ञानी ,अडाणी किंवा नावे ठेवली तरी तो ज्याची त्याची मानसिकता शेवटी ..
आम्हा खेडूतांना ज्यात आनंद त्यात आम्ही आयुष्य
सुंदर करण्याचा प्रयत्न करतो ....
राधे __/|\__कृष्ण
!! श्री स्वामी समर्थ !!
!! श्री स्वामी समर्थ !!
No comments:
Post a Comment