=-=-=-=-=-=-=-=-= आयुष्य खूप सुंदर आहे =-=-=-=-=-
व्यक्तीला भावना आणि व्यवहार यात आपण किती गुरफटावे याचा समन्वय
साधता आपला पाहिजे ... कारण जगात सर्वात जास्त सुंदर असेल तर आपला परिवार ... नंतर
आपले सगे सोयरे ....स्नेहीजन ,मित्रपरिवार ......
सुखाकडे आपण कसे पाहतो यावर सगळे अवलंबून आहे. थोडेसे नशिबाला
साथीला धरले तर बराचसा त्रास कमी ही होईल
नाही.....
माझ्या नशिबात , मिळेल तेंव्हा ते
माझे अशा विचाराने पहिले तर भविष्यात आपल्याला सुख मिळेल याची उमेद ही वाढते . आणि
जगण्याचा दृष्टीकोन ही बदलतो. नवरा किंवा बाईको आपल्या कर्तव्यात कुठे ही चूक करत
नसतील तर आणखीन बहार येते जीवनात...स्वातंत्र्य सगळ्यांनाच पाहिजे असते पण त्याचा ही गैर फायदा घेऊ नये , दोघांनी... जेणे करून सर्वत्र सुखी संसार आणि सुखी जोडपी दिसतील आपल्याला ......... आणि सर्वात महत्वाचे मी एक विनंती पूर्वक निवेदन करीन कि इंटरनेत च्या महाजालात प्रमाणापेक्षा जास्त गुरफटू नये ... कोणत्याही गोष्टीत आपल्याला नक्कीच समझते कि हे योग्य आहे कि अयोग्य ...फेसबुक ... ट्विटर , गुगल प्लस आणि इतर सोशल साईट्स ह्या फक्त तुमच्या वैचारिक देवान घेवाण साठी आहेत ... यात सकारात्मक जे आहे ते घ्यावे .... नकारात्मक च्या दिशेने जात असाल तर "आ बैल मार मुझे ' असे हि होऊ शकते ..... कारण हे मृगजळ आहे ...झगमगाट आहे ... या पासून जरा सांभाळूनच ..... याला आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग बनवू नये .... असे मला वाटते महत्वाचे फेसबुक ने मला कम्पुगिरी, रेणुकाआर्ट, माझ्यामना ,अर्धांगी ,आनंदवन ,माझ्यामना यासारख्या अतिशय सकारात्मक आणि माणसाला माणसे जोडणारी स्नेहीजन परिवार दिलाय हे तर मी कधीही विसरू शकत नाही . जे मला इंटरनेट शिवाय शक्य नव्हते . तसे खूप व्यक्त व्हावेसे वाटते ... पण थांबायलाच हवे न ..... ...... अर्थात हे माझे वयक्तिक मत आहे आपण सहमत असावेच असे नाही . कारण मी असा विचार करतो त्यामुळे मी माझ्या वैयक्तित आयुष्यात खूप सुखी आणि समाधानी आहे . म्हणून माझे आयुष्य खूप सुंदर आहे .......
.श्री स्वामी समर्थ ........
No comments:
Post a Comment