=====----- ब्रिजेस की बॅरिकेड्स ? ? ? पूल हवे आहेत, की अडथळे ? ? ? ?
आपले मन आपल्या जगण्यामध्ये व आपल्या स्वभावामध्ये इतके बेमालूम मिसळलेले
असते, की ते आपण गृहीत धरतो. इतके हातचे समजतो, की मनालाही आजार असतात,
मनाचेही
आरोग्य असते आणि मनाचीही काळजी घेतली पाहिजे,
आपले अडथळे आपणच निर्माण करतो, आपणच त्यात अडकतो आणि विलाप करतो. त्याऐवजी
इतरांशी संबंध जोडावेत, मैत्रीचे पूल बांधावेत, म्हणजे आपल्या अडचणी पार
करून इतरांशी हातमिळवणी करता येईल. एकट्याने रडत बसण्याऐवजी दुसऱ्याशी हस्तांदोलन
करून खुशीत हसता येईल.
पूल बांधायला शिका. अडथळे घालणे सोडून द्या, हा मुद्दा शिकायचा.
दुसरे हे ठरवा, की तुम्हाला काय हवे आहे? संघर्ष की संवाद? कॉन्फ्लिक्ट् की
कम्युनिकेशन?
संघर्ष निर्माण करणारे आपणच आणि संवाद करणारेही आपणच. संघर्ष केला तर मन
त्रासेल. संवाद केला तर मन सुखावेल. त्रासाचा ताप वाढवायचा, की सुखाची शीतलता आणायची,
हे आपण
ठरवायचे. संवाद करावा. संघर्ष कशाला?
संघर्ष, भांडण, द्वंद्व, विरोध, मतभेद हे सर्व एक-एक छटा वेगळी असणारे, पण असुख दर्शविणारे शब्द
आहेत. संघर्ष बाहेरच फक्त घडतो असे नाही, मनातही संघर्ष असू शकतो. भांडण दुसऱ्याशी
होते, तसे मनातल्या मनात घडू शकते. बाहेर दोघांत घडले, तर त्याला द्वंद्वयुद्ध
म्हणता तरी येते; आतल्या आत होते त्या ओढाताणीचे काय करणार? तेदेखील द्वंद्वच. विरोध,
मतभेद हे
दृश्यण असू शकतात, आंतरिकही असू शकतात. द्वंद्व म्हणजे ओढाताण, परस्परविरोधी, लठ्ठालठ्ठी.
म्हणजे अस्वास्थ्य.
कम्युनिकेशन म्हणजे संवाद. संप्रेषण. एकमेकांशी बोलणे. विचारांची
देवाणघेवाण. एकमेकांना समजून घेणे. जिथे संवाद आहे, तिथे शांती आहे. शांती
आहे तिथे स्वास्थ्य आहे.
विसंवाद नको. कर्कशपणा नको. बेताल नको. मधुरता हवी. ताळ राखावा. लय
सांभाळावी म्हणजे मन सुखात राहते. आरोग्यात राहते. पूल बांधावेत; अडथळे निर्माण
करू नयेत. संवाद राखावा, संघर्ष टाळावा. मनाचे आरोग्य राखण्यासाठीची ही दोन
सूत्रे प्रत्येकाला सहजपणे आचारणात आणता येतील.
प्रथम हे ठरवा, की जीवनात तुम्हाला काय हवे आहे? ब्रिजेस की
बॅरिकेड्स? तुम्हाला पूल हवे आहेत, की अडथळे?
इतरांबरोबर वागताना मतभेद होणारच. ते ओलांडू इच्छिता, की त्याचे अडथळे
करू इच्छिता?
आपल्याभोवती सगळे अडथळेच पाहायचे, आपल्या अडचणी आपणच निर्माण करायच्या, अशी सवय लागली,
तर आपल्याच
दगडी तुरुंगात आपणच कैदी होऊ आणि जन्मभर रडत बसावे लागेल. आपली चूक समझुन घेऊन ही
आपल्या स्नेहीने आपणास सॉरी म्हणून मोठ्या
मनाने दिलगिरी व्यक्त केली तर त्याचे मोठेपण समझुन घेणेतच नात्याची लय सांभाळणे
असे म्हणता येईल . पण त्यात परस्परविरोधी संवाद साधून विसंवाद करून मन आणि शरीराचे
आरोग्य अडचणीत आनणेस आपण स्वत: व्यक्तिश: जबाबदार असतो हे मात्र नक्की ..........
त्यामुळे शेवटचे एकदा काय ते निश्चित करा ब्रिजेस की बॅरिकेड्स? पूल हवे आहेत, की अडथळे?
सौजन्य ...... डॉ. उल्हास लुकतुके ...यांचे लेख वाचून सुचलेले काहीसं....
!! श्री स्वामी समर्थ !!
=== राधे __/|\__ कृष्ण ----
No comments:
Post a Comment