तू हो इतका तेजस्वी की,
सूर्याजवळ असावी तुझी उधारी..
आणि, हो इतका शितल की,
चंद्राला घ्यावी लागेल तुझ्याकडून शिदोरी..
असावी भरारी अशी की, एका झेपेत
एकाच क्षणात प्रदक्षिणा मारशील या जगाला..
आणि, हो इतका अनंत, अमर्याद की
तुझ्याकडून मोजाव लागेल अंतर या क्षितिजाला..
हा..! पण ...
थोडे सोसावे लागतील चटके दु:खाचे
चालताना बोचतील काटे टीकांचे..
पंख फुटेपर्यंत होईल थोडीशी फरफट आणि,
अस्तित्वासाठी करावी लागेल थोडी धडपड..
'वेडी माणस इतिहास घडवतात..'
असंच काहीतरी आपले सर म्हणायचे..
आणि, तुझ्याकडे तर..
No comments:
Post a Comment