Tuesday, April 14, 2015

' ती ' ---- प्रा. मनीषा जी जैन - बांदे -- मुंबई ......


                                                              ' ती '
                                                                 प्रा. मनीषा जी जैन - बांदे  
                                                                                                       मुंबई ......


ती
ती तशी साधीच परंतू चारचौघींसारखी मात्र निश्चितच नाही.
उच्चशिक्षित, प्रगल्भ, विचारी, संवेदनशील, हळवी, बाणेदार इ. बरेच काही गुण असलेली...

लग्न होऊन एका सामान्य वकूब असलेल्या त्याच्या गळ्यात पडलेली...
लग्नानंतर लगेच दिवस राहिल्याने करीयरवर पाणी सोडावं लागणारी...
तो दिवस भर कामासाठी बाहेर...
ही दिवसभर घरकाम व मुल यांच्यातच बुडालेली...

ती वाचनाची प्रचंड आवड...
वक्तृत्वात हातखंडा असलेली...
मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृतमध्ये तरबेज...
तो धड मराठीही न वाचता येणारा...
घरातच राहून हळूहळू तिच्यातली ठिणगी विझू लागतेय की काय ही तिला भिती...
मित्रमैत्रीणी कुणीही उरलं नाही...
बोलायला समविचारी, समवयस्क कुणीही नाही...
आर्थिक परिस्थिती बेतासबात...
नौकरी करते म्हणाली...
तो नको म्हणाला...
मुलाकडे कोण बघणार?
ते वाया जातील, वाईट संस्कार होतील...
तिला पटले...न पटले...ती घरातच राहिली...
पैसा पुरेनासा झाला...
ती मग घरातल्या घरातच काहीबाही उद्योग करू लागली.
ती घरातल्या घरातच मुलं सांभाळू लागली.
स्वतःच्या मुलाची आई होतीच आता शेजारपाजारच्या मुलांचीही दाई झाली.
त्याने विरोध केला...
पण चार पैसे हाती ठेवताच त्याचा विरोध मावळला...
तिला त्यातच खूप आनंद झाला...
तिच्या अस्तित्वाची जाणिव झाली...
त्याने नंतर तिला बँकेत अकाऊंट उघडून दिले.
ते स्वतःच्या नावाचं एटीएम कार्ड, पासबूक पाहून तीचा आनंद गगनात मावेना.
आता चार गरजा भागू लागल्या. फार नाही पण मिठमिरचीसाठी का होईना तीचा पैसा कामी येऊ लागला.
छान निटनेटकेपणाची आवड असलेली ती इस्त्रीला पैसे लागतात म्हणून ती कधीच स्वतःचे कपडे इस्त्री करत नाही.
तेवढीच बचत....
घालायचे...धुवायचे...नीट घडी करून ठेवून परत घालावयाचे...
तो ट्रेन प्रवास त्रासदायक होतो म्हणून घरात चिडचिड करू लागला...
तिने त्याला जमवलेल्या पैशातून दुचाकी घेऊन दिली.
ती पार्लरवाली खूप पैसे घेतात. ते पैसे घरखर्चाला उपयोगी पडतील म्हणून क्वचितच वर्षातून एखादेवेळीच पार्लरमध्ये जात असे. मी घरातच तर असते. कोण बघतंय मला...अन् आहे तशी मी छान आहे असे म्हणून टाळायची.
पुढे पुढे तो मानेला मुंग्या येतात म्हणून तक्रार करू लागला.
तिला वाटले स्पाँडेलिसीस असला तर?
कसं करावं? लगेच डाॅक्टर कडे घेऊन गेली. डाॅक्टर ने औषधी दिली. बरं वाटलं तात्पूरतं. पण परत तेच...
ती परत म्हणाली, "तूझी नौकरी, तब्येत महत्वाची. पैसे काय चाटायचेत? तूला काही झालं तर मी काय करू ?"
तीने त्याला लगेच चार चाकी घेण्यास पैसे दिले.
तो आता चारचाकीत जातो.
ती तिथेच तशीच घरात...
नाही म्हणायला तो कधीतरी गाडीत बसवून बाजारात घेऊन जातो.
त्याला जरा सर्दी झाली, दात दूखला की तो घर डोक्यावर घेणार...
तिच्याकडून सगळे करून घेणार...
तिला काहीही होत नाही हेच त्याला वाटतं...
झालं जरी काही तरी डाॅक्टरकडे नेलं की त्याचं कर्तव्य संपतं.
तो फारसा बोलत नाही घरी...
तिची बौध्दिक भूक फार...
पण त्याला क्रिकेटपलीकडचे जग माहित नाहीच.
तिला वाटतं कुणाशी तरी चालू घडामोडींवर चर्चा करावी.
पण तो थकून येतो.
घरी आला की जेवतो अन् झोपतो लगेच.
तिला काळा रंग फारच आवडतो.



काळी गाडी घे तर तो नको म्हणाला.
त्याने तांबडी घेतली.
गेल्या कित्येक वर्षांपासून तिला संक्रांतीला काळी चंद्रकला हवी आहे.
पण तो म्हणतो," तू कुठे साड्या नेसतेस?"
दर संक्रांत अशीच काळी चंद्रकला मनीमानसी लेऊन ती स्वप्नातच खुश होते.
काल तो कौतुकाने म्हणाला, "कित्ती हौस असते नं बायकांना.
आमच्या ऑफिसातील सर्व जणी छान काळ्या साड्या घालून येणार आहेत. नटूनथटून येणार आहेत.
धमाल येणार आज. "
कित्ती सहज तो असं बोलला.
तिलाही मन भावना आवड निवड आहे हे तो विसरूनच गेलाय बहुतेक.
ती जिवंत आहे की मेलेली?
ती उभी आहे.

काम करतेय म्हणजेच तिला काहीही झालेले नाही.
ती साधी घरगुती असल्याने तिला गरजा मुळीच नाहीत
हाच त्याचा समज झालाय. ती बोलून दाखवते.
तरीही त्याचे लेखी तिच्या शब्दांना किंमत नाही.
तो शांत बसतो. ऐकतो. कामावर निघून जातो.
ती आपली एवढ्या वर्षात आहे तिथेच आहे...
अगदी तिथेच...

                                          ***मनिषा***



              राधे __/|\__ कृष्ण                                                                               
                                               कैलास मांडगे ~~~~~~


मुक्तपक्षी भाग क्रमांक - ८

                                                        मुक्तपक्षी भाग क्रमांक - ८ 

हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.
अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे 




रोमांच झेलत अवखळायचे 
     थेंब गालावर ओघळत मिटायचं 
        सरींवर सरी झेलायचे 
          भिज बाई किती भिजायचे ~~~~~~~~        


दिन हो या रात यादे भुलाई नही जाती 
    साथ गुजारे हुये लम्हो को 
      हकीकत समझ बैठे 
         दुख तो इस बात का नही 
           लोग मुझे ताने दे देकर दुखते है 
              पर आज भी हमे उनका इंतजार है ~~~~



    कागदाची नाव चालवायची 
      सळसळत्या धारेत सोडायची 
         विश्वास ठेवत वल्हवायची 
           भोवऱ्यात न अडकता वाचवायची ~~~~~~


नवनवे थेंब घेतले अंगावर 
   झाले भिजणे किती मोहक 
        मुके मुके थेंब ओघळले खळीत 
           अवकाळी दणका भर मयसभेत



ऋतु नसतांना कसा बरसला 
  तुझ्या लहरींनं मन झाले बेजार 
    अमृत पाजणारा विषदूत भासला 
      नाही उरली नवलाई तुझ्या सरसरण्यात..





राधे __/|\__कृष्ण                                 कैलास मांडगे ~~~~~~~~~

स्वगत -- प्रा.मा. अलकाजी गांधी -असेरकर



                                                स्वगत -----                           प्रा.मा. अलकाजी गांधी -असेरकर 

दिनांक ८ मार्च महिला दिनी -- प्रा.मा. अलकाजी गांधी -असेरकर यांचे मला भावलेले स्वगत ...................
अलका जी गांधी ......... ह्या प्राध्यापिका असून नेहमी स्री विषयक लिखाण करीत असतात . महिला विषयक बाजू सकारात्मकतेने मांडून ..महिलांच्या सर्व अंगांतूनचौफेर असे त्यांचे लेखन असते . पण प्रत्येक लिखाणात त्यांची अपेक्षा असते . की हे मत माझे वयक्तिक आहे . आपणास किती भावते हे ज्याचा त्याचा व्ययक्तीक  विषय        असतो . त्यामुळे आपण सुद्धा वाचताना आपण सहमत असावेच असे नाही .

उद्या ८ मार्च...        
 साहजिकच अनेकांना तुझ्या प्रेमाचं भरतं येईल..
तसं ते नेहमी येत असतं...पण ते वेगळ्या कारणाने 
)..त्यात सर्वप्रथम तर तू माता म्हणून किती श्रेष्ठ आहेस या जगात ते तुला ठासून सांगितलं जाईल .पण ते त्यांच्या मुलांची माता म्हणून...तू त्यांच्याशिवायच माता झालीस तर तो कसा घोर अपराध आहे हे तुला चांगलंच ठाऊक आहे..
तात्पर्य, महत्त्व नुसत्या मातेला नाही..तर त्यांच्या वंशाची तू माता असल्याचं आहे)..(शिवाय, भाषेतल्या शिव्यांना माता-भगिनीमुळेच तर महत्त्व आहे नाही का...ती नसती तर सारे चतुष्पाद कुणाला लावता आले असते..)
.नंतर उतरत्या क्रमाने बहीण, सखी, पत्नी, प्रेयसी, मुलगी वगैरे वगैरे रुपात तुझे गुणगान गायिले जाईल...

सारे तुला सल्ले देतील...तुझे स्वातंत्र्य,
तुझ्या जाणीवा, तुझी मुक्ती, तुझं उडणं, तुझं नटणं, तुझे कपडे, तुझे केस, तुझे यंव, न तुझे त्यंव..हे सारं कधी, कसं असावं याच्या व्याख्या तुला पुन्हा शहाजोगपणे समजावल्या जातील.
..'त्यांच्या'शी बरोबरी करणं कसं चुकीचं आहे हेही चपखल शब्दांत समजावतील..त्यात तुझा भलेपणा कसा आहे हेही साळसूदपणे सांगतील...
असंही तुझ्याकरिता काय योग्य न काय अयोग्य हे तेच ठरवत आलेत आजपर्यंत...
.कारण तुला अक्कल नाही अशी त्यांची ठाम गैरसमजूत आहे....तू ही हो ला हो करत आजपर्यंत मुंडी हलवून  त्या  समजाला बळकटी दिलीयस.....तशीच देशील...

हे सारं तुला पटवून देण्यासाठी तुझ्यातल्याच काहीजणींची ते मदत घेतील...
             उद्या ते सारे तुझी महाआरती गातील...आणि तुझ्याशिवाय त्यांची कशी गती नाही हे संभावितपणे आळवतील..

आता या सा-याला सामोरं जाण्याची
 रात्रभर तयारी कर    ...देवी म्हणून सिंहासनावर बसायचंय, की 
प्रत्येक कौतुकाच्या वाक्याची तटस्थपणे शहानिशा करून माणूस म्हणून कसं वागायचं, ते तूझं तू ठरवायचं...हे तुझ्या हातात आहे.......
म्हणून मी ठरवतेय..     
 त्या प्रत्येक आदमला सांगायचं....माझ्यासाठी  काय भलं आणि काय बुरं हे माझं मला ठरवू दे आता...कारण मीही तर तुझ्याएवढीच वयस्क नाही का...
तुझ्या बरोबरच माझाही जन्म झालाय एकाच वेळी....
समजा अक्कल नसलीच, तर कदाचित ती तुझ्यात नसेल...कारण मी लाख तुला सफरचंद तोडायला सांगितलं...पण तू जर हुशार असतास तर तू ते तोडता ना.................. 



             ........ कविता माझी-.........
     कविता माझी तुमच्यासाठी
      कधीच नसते
      याच्यासाठी, तिच्यासाठी
      अन् 'त्या'च्यासाठी तर
       मुळीच नसते..
       कविता माझी अल्लड पोर
       कधी जीवाला उगीच घोर
       कधी मावळत्या चंद्राची कोर
       कधी उगवत्या दिनकराची भोर
कधी कंकणी किणकिणते
पैंजणी रुणझुणते
त्वेषाने खणखणते
कधी मनाशीच गुणगुणते
कविता माझी
भजनात दंगते
पुजनात रंगते
लावणीत नादते घुंगरासवे                                                                         पोवाडा गाते डफासवे
                                 
कधी चोरून फिरते
प्रेमाच्या गावाला 'त्या'च्यासवे
कविता माझी
रुढी तोडते रूढीत अडकते
स्वच्छंद उडते बेडीत फसते
ही तंत्राच्या पलिकडली
ना समीक्षेत सापडली
कशी कुणास सांगू वाचा कविता माझी.....

                                                                                                                                  -अलका

     राधे __/|\__कृष्ण                                            

=== मुक्तपक्षी - ६ ===

=== मुक्तपक्षी - ६  ===

हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.

अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे ....






      मुश्कील से जुडते है बंधन 
           इन्हे ऐसे टूटने ना दे 
                कदर करो यार रीश्तोंकी 
                     अफसानों को सवारते सवारते ~~~~~


धडकन ...सांसे ~~~ खयाल 
  ओर निंद ~~सबकुछ उनका 
       जज्बात -ए -इश्क अब उनसे 
            कैसे निभाये जाये~~~~~~


तुफानों में मिलकर ना टूट सके हम 
      एक दुजे के दिलमें 
         ना वो रह सके ........ ना हम 
            जीत लेते एकदुजे को एक दिन 
               पलकोसे बयां करते थे 
                मगर ओठोंसे जुबांपर 
                   ना ओ कह सके ~~~~ ना हम ...............






                                                               


आपकी मोहब्बत का 
    हर गम अच्छा लगा 
       उसका दिया हुआ 
          हर एक सितम अच्छा लगा ~~~~









बनती है पत्थर से मूर्ती 
      मगर दो दिल नही 
          वक्तने आंखोसे निंदे चुरा ली 
            दर्दने आंखो में घरोंदा बना लिया 
             मेरी हर दिल्लगी की कायनात है टू .........





              राधे __/|\__ कृष्ण                                                     कैलास मांडगे ~~~~~~~

=== मुक्तपक्षी - ५ ===


=== मुक्तपक्षी - ५ ===
 *हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर** ?**...* *आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर** ?**... 
* *ठरवले तर सहज शक्य आहे.* *अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे ....* 


     ' गंधाली '
                चिंब भिजले गवाक्ष 
               अलवार ओघळले आनंदाश्रू 
               सुगंधी दरवळ अक्षय आसमंत 
               सरीवर सरी बर्स्ल्यात 
 बाग हिरवी पैंजण फेर धरत 
मनी माझ्या साद घाली 
ओल्या मातीच्या गंधानं 
भारावली साजणीची हाक 
              झाल्या अनावर सरी 
             चिंब चिंब भाव सारे 
             उर भरून कासावीस 
             गंध आवडला फुलांचा 
             म्हणून फुलं नको गं 
माझ्या मनाला मीच 
बांध घालीन वेळीचं 
तुझं सुखं हेच गुंजन 
तीच आपली फुलबाग 
            पान फुलांची सळसळ 
            चंदेरी मुकुट चढवून 
            फुलराणी होईल प्रफुल्लित ~~~~~~

              कैलास ~~~~





जाणवतो आभास चैतन्याचा
    स्वप्न कोलमडतात सत्यात
        आठवणी सतावतात गतकाळाच्या
          अंतरंग ढवळते वर्तमानात ~~~~



    अंतरातले कासावीस गुंजन 
        आठव सारी काढतांना
           तुझीच सारी आवर्तन 
             निशांत वाटते मनाला ~~~~~











     गीत तुझे होतांना 
        गंध फुलांचा माळलेला 
          अलवार धुंद स्वर घुमताना 
                    चैत्राचा मोसम सुगीचा ~~~~~~


अवकाळी बरसला भयाण सरसरला 
      इंद्रधनू नसता बाकी कसा अंगार 
          बरसून बरसून बेजार झाला 
              तुझ्यावर नाही आता भरोसा ~~~




                                                                    राधे __/|\__कृष्ण                  कैलास मांडगे ..............