Saturday, September 19, 2015

आत्मविश्वास ..... स्वत: चा स्व: शी संवाद ............. डॉ. विद्याधर बापट .......

  • आत्मविश्वास ..... 

स्वत: चा स्वत : शी संवाद ............. 
डॉ. विद्याधर बापट ....... 




  • स्वत:त सुधारणा घडवून आणण्याची तीव्र इच्छाशक्ती हवी. आत्मविश्वास मिळवणं आणि वाढवणं हे प्रत्येकाला शक्य आहे हे लक्षात घेऊया.
  •  स्वत:मध्ये रुजलेली भिती व असुरक्षितता ह्यांना ओळखा, जाणून घ्या. त्यावरचे उपाय शोधा. आवश्यक तर तज्ञांची मदत घ्या.



  • स्वत:ची शरम वाटून घेऊ नका किंवा किंव करू नका.
  • एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कुठलाही माणूस परिपूर्ण नाही. कुणाच्याही हातून चुका होऊ शकतात. तशीच आपल्याही हातून चूक होऊ शकते. त्यामुळे निराश होऊ नका. स्वत:ला क्षमा करा.चूकांमधून शिका आणि पुनरावृत्ती टाळा.
  • इतरां पेक्षा आपण कमी आहोत ही भावना मनातून काढून टाका.
  • आपला स्वत:शी संवाद (self talk)  सतत चालू असतो. तो सकारात्मक होतो आहे ह्याकडे लक्ष्य द्या.
  • इतरांकडून दयेची, सहानभूतीची अपेक्षा करू नका. त्यानं तुमची आत्मप्रतिमा दुबळी होईल व आत्मविश्वास कमी होईल.

  1. तुमच्या बलस्थानांचा सतत विचार करा, ती शोधून काढा, त्यावर लक्ष केंद्रित करा.
  • मिळालेल्या लहानशा यशाबद्दल सुद्धा स्वत:ला शाबासकी देण्याची सवय ठेवा, स्वत:ला प्रोत्साहन देत रहा.
  • घडून गेलेल्या किंवा घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगातली चांगली बाजू लक्षात घेण्याचा प्रयत्न करा.
  • अपयश हा आयुष्याचा भाग आहे. त्यानं हताश होऊ नका. सकारात्मक विचार करा. पुन्हा प्रयत्न करा.




  •  योग्य त्यावेळी मदत मागण्यात लाज बाळगू नका. आयुष्यात प्रत्येकाला मदत लागते हे लक्षात ठेवा.
  •  .स्वत:ला relaxed अवस्थेत ठेवण्याची कौशल्ये आत्मसात करा म्हणजे तणावाच्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही स्थिर राहाल व आत्मविश्वास डळमळणार नाही.
  •  तणाव नियोजनासाठी आवश्यक तेंव्हा वेळ न दवडता तज्ञांची मदत घ्या. कारण तणावाखाली असाल तर आत्मविश्वास मिळवणं/वाढवणं अवघड आहे. 

सौजन्य ---- सकाळ वृत्त पेपर ....




मुक्तपक्षी भाग क्रमांक - 20

हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.

अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे.


तुझ्या डोळ्यातून एकाच वेळी
झरताना दिसेल समझुन घेतल्याचे भाव
      दाटणाऱ्या प्रश्नांची मिळतील उत्तरे
      दाबीत ओठात दात ~~~~~~



तुझे ओघळणारे अश्रू
  टिपायला जेव्हा माझे हाथ नसतील
     उसवलेले ठिगळ लावलेलं मन
       हुल्लडबाजीतही अंतरी विव्हळेल ~~~~~




खपल्या जखमांच्या खरचटल्या
  वादळाने साहिले ठाम संयमाने
      विझून पेटावे पुन्हा कितीदा
         नको फुका छळणारे शिडकावे ~~~~~~



मावळती चंद्रकोर मंदावते
   रंगतरंग निळाईचा तु अंतरात्मा
      लेवून उगवत्या दिनकराची भोर ल्याले
        चंद्र सखा , वेडं नभातला ~~~~




मावळतीला परसदारी 
   संध्याची लालीमा ओसंडते 
     अंगावर येणाऱ्या किरणांची 
      आठवण खळखळून मोहरते ~~~~~





राधे __/|\__ कृष्ण                              !! श्री स्वामी समर्थ !!
                                                         कैलास मांडगे 

मुक्तपक्षी भाग क्रमांक - 19

हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.
अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे.










आयुष्य अस्वस्थ चंचल रोज
   भावना रेशीम धाग्यात गुंभुन बघ
     समझुन उमजून निळाईत गुंतवून बघ
         आठवांचा खेळ रुजवून बघ ~~~~~~




आयुष्याच्या पोथीची उलटली पाने
    मनाचे सौंदर्य हेच गणित शिकलो
       व्यभिचार सौंदर्यात वासना नाही शोधले
         उध्वस्त नगरात कधी न थांबलो ~~~~






अजम्नाची अलवार का ही ओढ
     सूर्य गातोय मिलनाचे गीत
         लाट उफाळून विळखा घालत
            सलगी किनार्याची करते अवखळ ~~~~~





अलवार तुझ्या मनाचा
    खुलवताना अलगद एक एक कप्पा
       छ्कुलीसमं अल्हड अबोध सांगावा
          हळूच आठवात हृदय गुंतताना ~~~~




भावनांची झिंग ओठांतून उलगडते 
  पूर्वीपेक्षा आज निराळी भासली 
     तेजपुंज पौर्णिमेची चांदनी टीमटीमली
      तिचे तेज तुझ्या बरसन्यातून कळाले ~~





राधे __/|\__ कृष्ण                              !! श्री स्वामी समर्थ !!

                                                         कैलास मांडगे 

मुक्तपक्षी भाग क्रमांक - 18

हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.

अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे.






गतकाळा सारखेच जग सुंदर
     वेळी अवेळी डोळ्यात साठणारे
         केव्हा गप्पा .... मध्येच रुसवा
               सहवासाची ओढ न संपणारे ~~~~~


गुपित सारं जाणवतं
    मन धावतं पुष्करणीत
       उचलते फुलं खुशीत
         जे जे तुला आवडते ~~~~~



सरळ हमरस्त्यावर असताना
     अधून मधून वळणे ही असतात
          पटपट नाही होणार मनासारखं
              म्हणून झपझप थोडं चालायचं ~~~



जीवनात योजीलेली सुमने
     स्पर्श करीत आले
           आपल्या खोप्यात परतलो
              हरित तृणांच्या मखमलीत~~~~~


तु येशील आयुष्य बदलशील 
    जिव्हाळ्याचे उमाळे उठतील 
       ओलेचिंब क्षण आठवात जपशील 
         नकळत होणाऱ्या भेटीला आतुरशील ~


राधे __/|\__ कृष्ण                              !! श्री स्वामी समर्थ !!
                                                         कैलास मांडगे 

मुक्तपक्षी भाग क्रमांक - 17

हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.

अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे.






  आत्मविश्वासाने मिळविलेले भावविश्व
    उंच झेप घेऊन बांधलेलं घरट
       त्यात जीवापाड जपूया नातं
           खुलू दे त्यात अजोड तारांगण ~~~~~~





आयुष्य सोनसळी चा भास
   आवडती मधुगंधा मनविभोर सांज
        साजन वेडा गडगडट घाली साद
            उब दाटता रिमझिमता रोमांच ~~~




विद्रोह जेव्हा पेटतो डोळ्यात
     उजाड ज्याने केले विश्व सारे
          पदोपदी धगधगता विखार
             नको जखमांवर चंदन उगाळणे ~~~~






धपापु दे थेंब टपोरे वादळी
      कोंडू दे श्वास घट्ट माझा
         मज हवी पुन्हा तृप्ती
             धुंद मनाचा फेसाळू दे किनारा ~~~~~~










      धूप चाहे खुद को कम कर ले
         चांदणी का मंझर नहीं बन सकती 
            आप तो खुलते चांद की तरह 
              हम तो उलझी शाम की तरह ~~~~~




राधे __/|\__ कृष्ण                                                                         !! श्री स्वामी समर्थ !!
                                                         कैलास मांडगे